पार्ङी निंबी
वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय पुसद यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष ग्रामीण शिबीराचे आयोजन 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2025 पर्यंत सेवादास नगर येथे करण्यात आले आहे.
अध्यक्षस्थानी आशिष बिजवल उपविभागीय अधिकारी पुसद हे होते उद्घाटन पार्ङी ग्रामपंचायतचे प्रशासक व्ही. एन. पिंपळे व उषाताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून विजय जाधव, ढेकळे, प्रा. वंदना पोले. प्रा. डॉ.सय्यद सलमान सय्यद शेरु हे होते.
समाधान केवटे मुख्याध्यापक जयश्री पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा वसंतराव नाईक यांच्या फोटोचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सलमान सय्यद व व्ही. एन. पिंपळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या आज दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये मोफत पशु चिकित्सक व जनावराची लसीकरण आरोग्य विषयक मार्गदर्शन महिला सुरक्षा जनजागृती सक्षमीकरण बौद्धिक कार्यक्रम कृषी विभागाच्या योजना मोतीबिंदू तपासणी शिबिर व नेत्रदान जागृती आदी विविध कार्यक्रम होणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक एस. एल.राठोड, माजी कार्यक्रमाधिकारी नरेश राठोड, पंडित राठोड,कार्तिक माहुरे,कुमारी वेदिका चव्हाण,दर्शन राठोड,राहुल राठोड, अंकुश जाधव,गुंजन माघाडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. कु. रश्मी डेकाटे यांनी केले.








