पार्ङी निबी
अपर आयुक्त़, आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत येणाऱ्या सातही प्रकल्पातील शासकिय/अनुदानित आश्रम शाळांच्या विभागीय क्रिडा स्प़र्धा दि. 16 ते 18 डिसेंबर 2025 रोजी अमरावती येथे भव्य़ उत्साहात क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या विभागीय क्रिडा स्पर्धेत महात्मा मुंगसाजी आदिवासी शिक्षण संस्था पुसद व्दारा संचालीत महात्मा मुंगसाजी आदिवासी माध्य़. व उच्च़ माध्य़. आश्रम शाळा, मरसुळ ता. पुसद जि. यवतमाळ या शाळेने विभागीय क्रिडा स्पर्धेत सुयश संपादन केले.
19 वर्षे वयोगटा आतील मुलींच्या खो-खो संघात कष्णाली गव्हाळे, तेजल राठोड, अंजली भिसे, कावेरी राठोड, वैष्णवी घुक्से, नंदनी राठोड, गिता कन्हेरे, सलोनी जाधव, राणी राठोड, नव्या राठोड, अंजली राठोड, रोशनी बोडखे यांचा सहभाग होता. या स्पर्धेत पुसद, कळमनुरी, पांढरकवडा, अकोला, धारणी, किनवट, संभाजीनगर या सात प्रकल्पातील सात संघाचा समावेश होता. पुसद प्रकल्पातील मरसुळ आश्रम शाळेच्या खो-खो संघाने कळमनुरी, धारणी, अकोला प्रकल्पातील संघाला यशस्वी लढत देवुन अमरावती विभागतुन सर्व प्रकल्पानां मागे ठेवत प्रथम क्रमांक मिळवून राज्य़स्तरावर आपले स्थान निश्चित केले.
वैयक्तीक क्रिडा स्पर्धेत आश्रमशाळा मरसुळ ची कृष्णाली शालीक गव्हाळे या विद्यार्थीनीने 400 मिटर रनिंग प्रथम, 100 मिटर रनिग, व्दितीय तर लांब उडी मध्ये विभागतुन व्दितीय क्रामंक मिळवुन अमरावती विभागातुन तिन इव्हेंट मध्ये राज्य़स्तरावर प्रतिनिधीत्व़ करण्याची झेप घेतली आहे.
आश्रमशाळेने मिळविलेल्या विभागीय स्पर्धेतिल सुयशाकरिता शाळेचे क्रिडा शिक्षक जि.आर. ठाकूर, बि.एच. साबळे, वाय.आय. परसुवाले व शाळेचे प्राचार्य ए.जी. सय्य़द यांनी यशस्वी मार्गदर्शन केले.
आश्रमशाळा प्रेरणादायी शिक्षक, कुशल व्यवस्थापन व दूरदूष्टी पुर्ण नेतृत्व़ यांच्या आधारावर उच्च़ दर्जाच्या शिक्षकांनी नवे मानक प्रस्थापीत करुन विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांना तेज दिशा देण्याचे कार्य करित आहे. आश्रमशाळा शैक्षणिक व क्रिडा स्पर्धेत निरंतर प्रगती करुन दुर्ग्म डोंगराळ भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आलेख उंचावत आहे.
शाळेचे निरंतर प्रगती, शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व क्रिडा प्रगतीचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी संस्थेचे आधारस्तंभ माजी मंत्री ॲङ शिवाजीराव मोघे यांनी यशस्वी विद्यार्थीनींचे अभिनंदन व कौतुक करुन राज्य़स्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
एकात्मीक आदिवासी विभाग प्रकल्प़ पुसदचे प्रकल्प़ अधिकारी अमोल मेतकर, स.प्र. अधिकारी चव्हाण, चटलेवाड, संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र मोघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वऱ तडसे शाळेचे युवा संचालक लिलाधर मळघणे, प्राचर्य – ए.जी. सय्य़द, क्रिडा शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले व राज्य़स्त़रीय स्पर्धे़करिता शुभेच्छा दिल्या.








