भारत भूमीला मानवतेचे अधिष्ठान पूर्वीपासून आहे... येथील मूळ संस्कृती संस्काराची मखर बांधलेली आहे... अशा या भूमीमध्ये मानवता उभी करण्यासाठी अनेक महापुरुषांनी योगदान दिलेले आहे.. त्यामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये साहित्याच्या व कृतीच्या माध्यमातून साने गुरुजींनी जगाला मानवतेचा संदेश दिला... अशा या ठोकणे त्याचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालघर या गावी १८९९ ला झाला.. पालगड हे गाव सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात असलेले गाव आहे.. या गावांमध्ये फळाफुलांच्या मध्ये घरे असलेले टुमदार गाव होते... अशा गावांमध्ये थोर देशभक्त श्याम म्हणजेच साने गुरुजींचा जन्म झाला.. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव साने होते.. आईचे नाव यशोदा होते... वडील कोर्टामध्ये काही काळ नोकरीला होते . त्यानंतर त्यांनी शिक्षकाचेही काम केल्याचे पुस्तकांमध्ये नमूद केलेले आहे... त्याकडे शिक्षकाची नोकरी खूप पैसा कमवून देणारी नव्हती... त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाह करणे झालं गुरुजींच्या वडिलांना कठीण जात होते... साने गुरुजींचे आजोबा इंग्रजांच्या काळामध्ये महसूल गोळ्या करणाऱ्या खोताचे काम कधीच होते.. त्यावेळी त्यांची परिस्थिती आर्थिक दृष्टीने चांगली होती. खोत हे शेतीवरील कर वसूल करण्याचे काम करीत असत.. आजोबा हे धार्मिक वृत्तीचे होते.. आपल्या कामाशी प्रामाणिक होते.. त्यांना धार्मिक ग्रंथ वाचन करण्याचा व त्यावर प्रवचन करण्याचा छंद होता.. गावामध्ये विविध ग्रंथावर विवेचन करण्यासाठी त्यांना बोलावले जात होते.. साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते.. आई त्यांना श्याम नावाने हाक माहीत असे... पालगड गावामध्ये ही श्याम नावाने पांडुरंगाला ओळखले जात होते... पांडुरंग या शब्दाचा अर्थ होतो पांडू म्हणजे स्वच्छ आणि रंग म्हणजे ज्याच्यामध्ये मानवतेचे अप्रतिम रंग भरलेले आहे असा तो पांडुरंग होय... श्याम हा लहानपणी फारच घाबरट विद्यार्थी होता. यशोदा मातेने अनेक संस्कार करून त्याला सशक्त विद्यार्थी बनवले.. उत्तम नागरिक होण्यासाठी लागणाऱ्या सर्व सामुग्री सानेंच्या जीवनात ओतप्रोत भरल्या... श्यामने आपल्या लहानपणाच्या संपूर्ण आठवणी "श्यामची आई"या आपल्या प्रसिद्ध पुस्तकात मांडल्या आहेत.. हे पुस्तक नाशिकच्या जेलमध्ये असताना साने गुरुजींनी लिहिले.. साने गुरुजींचे प्राथमिक शिक्षण पालगड येथे झाले.. माध्यमिक शिक्षण दापोली व पुणे येथे झाले... माध्यमिक शाळेपासूनच त्यांना कविता करण्याची सवय लागली.. साने गुरुजींनी मराठी विषयात पुणे येथील महाविद्यालयामध्ये एम .ए केलेले होते. त्या कॉलेजचे नाव आताचे परशुराम कॉलेज आहे... घरची परिस्थिती हलाखीची असल्याने वसतिगृह असलेल्या ठिकाणी शिक्षण केले... साने गुरुजींना तत्त्वज्ञानाची फार आवड होती.. त्यामुळे केसरी या वर्तमान पेपर मध्ये आलेली जाहिरात वाचून अमळनेर येथील तत्वज्ञान विषयाचा अभ्यास करण्यासाठी साने गुरुजी अमळनेर ला आले... शिक्षणासाठी पैसा नसल्याने अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक रुजू झाले... विद्यार्थ्यांवर अतोनात प्रेम करणारा शिक्षक म्हणून त्यांना लोक ओळखू लागले.. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल दिसून आला.. शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना वसतिगृहाची जबाबदारी दिलेली होती.. साने गुरुजी विद्यार्थ्यांमध्ये राहुन त्यांचे काळजी घेत असत... काही विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी त्यांच्या वेतनातून पैसे भरत असत.. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एका वेळचे जेवण करणारा एकमेव गुरुजी म्हणजे सानेगुरु साने गुरुजी होय...१९२४ ते १९३० या सहा वर्षाच्या सेवेनंतर सविनय कायदेभंग या चळवळीमध्ये भाग घेण्यासाठी जळगाव मधील पिंप्राळा हे गाव गाठले.. त्या गावांमध्ये स्वदेशी कपड्याचा प्रचार प्रसार चालत असे.. स्वदेशी कापड बनवण्यासाठी हातमाग होते... महात्मा गांधीच्या विचारांचा प्रभाव साने गुरुजींवर झाला... देशासाठी आपले जीवन समर्पित करावे ह्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली...१९३६ मध्ये काँग्रेसचे फैजपूर येथे अधिवेशन भरले... ह्या अधिवेशनामध्ये साने गुरुजींनी मैला वाहून नेण्याचे काम केले... तेथील संपूर्ण स्वच्छता करण्याचे काम विद्याविभूषित साने गुरुजींनी केले.. काम करण्यामध्ये कोणताही कमीपणा त्यांना वाटला नाही... स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतल्यावर अमळनेर म्हणजेच खानदेश शी संपर्क चालू ठेवला...अमळनेरच्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे महान काम केले... उत्तमराव व लीलाताई यांना वेळोवेळी प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले... अमळनेर मध्ये भूमिगत राहुन साने गुरुजींनी स्वातंत्र्यासाठी काम केले... साने गुरुजींनी विद्यार्थ्यांसाठी " विद्यार्थी" नावाचे मासिक चालू केले होते... साने गुरुजींना वेळोवेळी तुरुंगात जावे लागले... तुरुंगात त्यांनी अनेक साहित्य लिहिणे लिहिले.. बंगाली, तमिळ भाषा शिकले.. संस्कृत व मराठी, इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभूत्व होते... तमिळ भाषेतील तिरुवल्लर यांच्या तमिळ भाषेतील पुस्तक अनुवादित मराठी भाषेत केले...महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आंदोलने केली... त्यावर त्यांनी प्रेरणादायी गीते लिहिली... त्यांचे प्रसिद्ध गीत जे शेतकऱ्यांसाठी लिहिले.. आता उठवू सारे रान या गीतातून शेतकऱ्यांची अस्मिता जागृत केली... साने गुरुजींनी एकूण ७३ पुस्तके लिहिले... प्रत्येक पुस्तकाची भाषा साधी, सरळ, अप्रतिम अशी आहे... प्रभावी शब्द परंतु त्याला मधुरता आहे... माणसाला विचाराने चेतावणारी भाषा आहे... सर्वधर्म समभाव असणारी त्यांची विचारधारा देशाला मोहित करून गेली... सर्व जाती, धर्म ,पंथ यामधील विविधता ही भारताला मिळालेली अप्रतिम देणगी आहे... या विचारातूनच भाषे भाषेतून प्रांतातून होणारे वाद मिटण्यासाठी "आंतरभारती"ची स्थापना केली... सर्व भाषा ह्या एकत्रित नांदल्या पाहिजे.. प्रत्येकाची महती कायम राहिली पाहिजे अशा विचाराचे साने गुरुजी होते... सर्व प्रांत ही एकमेकांमध्ये गुंफले गेले पाहिजे अशी त्यांची विचार होते.. आपला भारत बलशाली झाला पाहिजे यावर त्यांनी सुंदर गीत लिहिलेले आहे... "बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो"भारता हा असा बलशाली झाला पाहिजे ज्यामध्ये कोणत्याही दुष्ट विचाराने तो दुभंगला नको पाहिजे अशी त्यांची विचारसरणी होती... धर्मा धर्मा मधील वाद कायमचे मिटण्यासाठी धर्म कशासाठी निर्माण झालेला आहे हे आपल्या गीतातून पटवून दिलेले आहे.. "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे"या गीतातून धर्म म्हणजे प्रेम वाटणे होय.. द्वेष वाटणे हा धर्म नव्हे.. धर्माने प्रेम ,आपुलकी, ममता वाढली पाहिजे.. असे वाढत असेल तरच तो धर्म होय... धर्म म्हणजे त्यांच्या भाषेत उत्तम कर्तव्य होय.. साने गुरुजींनी साधना नावाचे अप्रतिम मासिक सुरू केले... अजूनही हे मासिक ज्ञानदानाचे काम करीत आहे... स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत साने गुरुजींनी आपल्या विचाराची नाळ काँग्रेसच्या विचारसरणीशी जोडलेली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसच्या विचारसरणी बदल झाल्याचे दुःख त्यांना होते... त्यामुळे समाजवादी विचारांशी साने गुरुजी जुळले गेले... साने गुरुजींच्या विचाराचा देश निर्माण झाला नाही... जाती जाती मधील अस्पृश्यता मिटवता आली नाही... आधुनिक काळात जातीच्या आधारावर मंदिरात प्रवेश मिळत होता.. यासाठी अस्पृश्य लोकांना पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण करून अस्पृश्य जातींना प्रवेश मिळवून दिला होता... समता, बंधुता, न्याय असलेला विचार प्रत्यक्ष रुजत नसल्याने साने गुरुजी अस्वस्थ होते.. समाजवादी विचारातून त्यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली.. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य त्यांनी हाती घेतले... त्यांच्या विचाराच्या पठडीत अनेक लोक तयार झालेत... विश्वबंधुत्वाचे अप्रतिम संकल्पना त्यांनी भारतवासीयांना सुपूर्द केली.. देशामध्ये कुठेही द्वेष वाढता कामा नये... प्रेम हाच सर्व विचारांचा पाया असावा अशी धारणा त्यांची होती.. महात्मा गांधींची हत्या दृष्ट नथुरामाने केली... हे ऐकून गुरुजी खिन्न झाले.. त्यांनी 21 दिवस उपवास केला... देश सेवेच्या कार्यामध्ये संपूर्ण जीवन वाहून घेतलेल्या साने गुरुजींना आपल्या आईच्या प्रेत यात्रेला जाता आले नाही... मनामध्ये खूप मोठे दुःख जपत गुरुजी जगत होते... देशाच्या स्वातंत्र्यानंतर अपेक्षित असलेला बदल झाला नाही... आपल्या विश्वबंधुत्ववादी विचाराचे पायमल्ली होत आहे असे निदर्शनास आल्याने त्यांनी ११ जून १९५० रोजी आत्मक्लेष करून देह संपविला... भारतामध्ये असे अनेक लोक, संत होऊन गेले की ज्यांच्या विचाराने देशाला वेगळेपण बहाल केले... साने गुरुजींनी अमापाशी ग्रंथसंपदा आम्हाला दिली... प्रत्येक ग्रंथातून मानवतेची धारा वाहत आहे... साने गुरुजींच्या वास्तव्याने पुनीत झालेली अमळनेर नगरी साने गुरुजीच्या विचाराचा सुगंध अद्यापही कमी झालेला नाही... अशा थोर विभूतीला त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन!!!







