पुसद :-तालुक्यातील पारध जंगल परिसरात एका बिबट्याचा विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. सदर बिबट्या रात्रभर विहिरीत अडकून पडल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
रात्रीच्या वेळी बिबट्या विहिरीत अडकल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याला पाहण्यासाठी तसेच घटनेची माहिती घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिक रात्रभर विहिरीजवळ जमले होते. त्यामुळे घटनास्थळी तुफान गर्दी पाहायला मिळाली.
बिबट्या विहिरीत अडकल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली असून, त्यांच्याकडून बचावकार्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे, गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







