Home » शैक्षणिक » शिक्षण » मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाने नटली ग्रामपंचायत चोंढी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाने नटली ग्रामपंचायत चोंढी

Share:


पार्ङी निंबी
पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चोंढी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मागील शंभर दिवसापासून मोठ्या थाटामाटात चालू आहे, याची परिचिती व परिणाम आता दिसू लागले आहे, सदर अभियानामध्ये ज्या मालमत्ता धारकांनी शंभर टक्के कराचा भरणा केल्यामुळे अशा एकूण 30 मालमत्ता धारकांचे ग्रामपंचायतीकडून एका वर्षासाठी दोन लक्ष रुपयाचा विमा काढण्यात आला आहे,

यासोबत ग्रामपंचायतीने चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे गावात सामाजिक सुरक्षितता जपण्यात आली आहे तसेच I LOVE CHONDHI या नावाचा सेल्फी पॉइंट बघण्यात आला आहे, या पॉईंट मुळे तारुण्य पिढीमध्ये मोठा उत्साहाचे वातावरण दिसत आहे
गावकऱ्याच्या सल्ल्याने व ग्रामपंचायतीच्या तत्परतेने गावाला एकसमान गुलाबी रंग लावण्याचे काम हाती घेतले आहे यामुळे सर्वधर्म समभाव जपण्यामध्ये ग्रामपंचायतीने प्रयत्न केला आहे, यासोबतच गावात सर्व घरावर एकसमान कलर लागल्यामुळे सर्वांच्या भिंतीवर शाळा उपयोगी अभ्यासक्रमाचे चित्र रेखाटण्यात आले आहे.

यामुळे गावात चालती फिरती शाळा बनविण्यात आली आहे याचा परिणाम म्हणून गावात एकही शाळाबाह्य विद्यार्थी आढळून येत नाही यासोबत समृद्ध दिवाळी अंतर्गत शासनाने आव्हान केल्याप्रमाणे गावात मोठ्या प्रमाणात लोक वर्गणीचे रक्कम जमा करण्यात आली आहे या रकमेमधून गावामध्ये लग्न समारंभामध्ये उपयोगी पडणारे सर्व प्रकारचे भांड्याची सोय करण्यात आली आहे यामधून गावातच भांड्याची बँक बनविण्यात आली आहे या बँकेतून लग्न समारंभामध्ये दोन रुपये प्रति दिवस याप्रमाणे आवश्यक असलेली भांड्याची उपलब्ध निर्माण करून देण्यात आली आहे
शिवाय आदिवासी बांधव मार्फत महिला व ग्रामसभा घेऊन समाजामध्ये होणाऱ्या लग्न समारंभामध्ये वधू पिता व वर पिता यांना कापड आहेर देण्याऐवजी रोख रकमेचा आहेर करण्यावर भर व डीजे सारख्या अनावश्यक गोष्टीवर बंदी करण्यात आली आहे यामुळे सामाजिक आर्थिक विषमतेची दूरी दूर करण्याचे समाजाने ठरविले आहे
याशिवाय ग्रामपंचायतला वेगवेगळे नाविन्यपूर्ण पुरस्कार प्राप्त झालेले आहेत यामध्ये आय.एस.ओ. नामांकन प्राप्त कागद रहित ग्रामपंचायत दर्जा स्मार्ट ग्राम पुरस्कार निवडणुकीमध्ये बिनविरोध असणारी ग्रामपंचायत सदस्य यासोबतच मी या वाकी ही जगप्रसिद्ध लावण्याची पद्धत अवलंबल्यामुळे पंचक्रोशी मध्ये गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
सदर अभियानाची सांगता ही 31 डिसेंबर 2025 ला होत असल्याने मागील शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये झालेल्या वेगवेगळ्या विकास कामामुळे सदर अभियान हे यशस्वी झाल्याचे जनमानसात चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *