राजना (ता. पुसद) येथील गजानन मस्के यांचे यशस्वी ऑपरेशन
पुसद तालुक्यातील राजना गावातील तरुण गजानन मस्के यांना ब्रेन ट्यूमर सारख्या गंभीर आजाराचे निदान झाले होते. या कठीण प्रसंगी संपूर्ण गाव एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहिले. योग्य उपचारासाठी मुंबई येथील के. एम. हॉस्पिटल, परेल येथे त्यांना दाखल करण्यात आले.
या उपचार प्रक्रियेत शेंदूरजना येथील समाजसेवक तथा ‘आरोग्यदूत’ म्हणून ओळखले जाणारे रविभाऊ राठोड यांनी मोलाची भूमिका बजावली. आरोग्यदूत म्हणून संपूर्ण परिसरात परिचित असलेल्या रविभाऊंनी वेळोवेळी मार्गदर्शन, संपर्क व मदतीची जबाबदारी पार पाडली.
गजानन मस्के यांना वाचवण्यासाठी गावातील तरुण वर्गाने विशेष प्रयत्न केले. तसेच राजना गावातील नागरिकांनी आर्थिक मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले. सर्वांच्या सहकार्यामुळे गजानन मस्के यांचे ऑपरेशन यशस्वी झाले असून सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे.
ही घटना म्हणजे एकी, समाजभावना आणि मानवतेचा जिवंत आदर्श ठरली आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि समाजसेवकांच्या प्रयत्नातून एक तरुण पुन्हा नवजीवनाकडे वाटचाल करीत आहे, ही बाब सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.







