यवतमाळ : ग्रामीण असो अथवा शहरी पत्रकार समाजाच्या वेदना टिपून वृत्तपत्राच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी व्यवस्थेसोबत झगडतो. यात पत्रकारांचे मात्र आपले घर, कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. त्याला आपले हक्क मागूनही मिळत नाही.पत्रकारांचे कुटुंब आणि हक्कासाठी लढण्याचा संकल्प पत्रकार दिनी करण्यात आला.
व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने यवतमाळ येथील विश्रामगृहात मंगळवारी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय राठोडं होते. यावेळी पत्रकारांच्या पाल्याना स्कुल बॅग वितरण करण्यात आले. उपस्थित व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील पुसद तालुका अध्यक्ष समाधान केवटे, दारव्हा तालुका अध्यक्ष धीरज राठोड, महागाव तालुका अध्यक्ष सचिन उबाळे, घाटांजी तालुकाध्यक्ष प्रेम चव्हाण, पांढरकवडा तालुका अध्यक्ष संतोष मोमीडवार, उमरखेड तालुका अध्यक्ष विश्वास काळे, दिग्रस तालुका अध्यक्ष जय राठोड, नेर तालुकाध्यक्ष राजेश धोटे, कळंब तालुका अध्यक्ष रुस्तम शेख, जरी तालुका अध्यक्ष योगेश मडावी, बाबुळगाव तालुका अध्यक्ष स्वप्निल मुडे, यवतमाळ तालुका अध्यक्ष प्रवीण राठोड, मारेगाव तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम, वणी तालुका अध्यक्ष मनोज नवले, राळेगाव तालुकाध्यक्ष स्वप्नील वटाणे, आर्णी तालुका अध्यक्ष राम पवार हे उपस्थित







