
पार्ङी निबी
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान पुसद तालुक्यात अनेक गावात राबविण्यात येत आहे. त्यापैकी नावीन्य उपक्रम राबविणारे गाव म्हणजे चोंढी
मागील 116 दिवसापासून हे अभियान ग्रामपंचायत चोंढी येथे सुरू असून या अभियानामध्ये गावाच्या विकासाचे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत मार्फत रविवारी श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात आले या श्रमदानामध्य 160 नागरिकांनी स्वच्छता केली पंचायत समिती पुसद येथील गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड यांच्या नेतृत्वात सर्व विभागाचे कर्मचारी व अधिकारी तसेच सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या समवेत गावातील बचत गटातील महिला ,ज्येष्ठ नागरिक ,शाळेतील मुले, यांनी स्वच्छता अभियानामध्ये मोठ्या हिरारीने सहभाग घेऊन गावात मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली,
यावेळी गावांमध्ये प्रभात फेरी काढून स्वच्छतेचे संदेश देण्यात आले तसेच गावातील महिलांनी अंगण स्वच्छ करून घरासमोर रांगोळी काढल्या बचत गटामार्फत यावेळी झाडणी बांधून अभियान सहभाग नोंदविण्यात आला या श्रमदाना ची सुरुवात पंचायत समितीचे वाहनचालक आनंदराव शिंदे यांच्या तुकडोजी महाराज यांच्यावरील स्वच्छतेच्या गीताने झाली तसेच अभियानमध्ये पंचायत समिती पुसद येथील गटविकास अधिकारी अमोल कुमार आदेलवाड विस्ताराधिकारी संतोष डाखोरे विलास पिंपळे ए आर शेख, एन आर एल एम, चे गौरव कांबळे शाखा अभियंता विनोद चव्हाण राजू पुरी.ग्रामपंचायत अधिकारी डीएन ई 136 संघटनेचे जिल्हा कार्य अध्यक्ष तुकाराम राठोड तालुका अध्यक्ष संजय हिंगाडे, सचिव संतोष तडसे, अश्विन तांबडे व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी ,शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद, गावातील आजी-माजी पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील,सरपंच उपसरपंच, व गावातील तरुण मंडळ, शाळेतील मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
हास्य जत्रा कलाकार व मुख्यमंत्री पंचायत राज अभियान ॲम्बेसिडर भारत गणेशपुरे हे लवकरच या गावात येणार असुन अभियानाच्या विकास कामानिमित्त भेट देणार आहेत.व गावाची पाहणी करणार आहेत.







