पार्ङी निबी
महात्मा मुंगसाजी आदिवासी शिक्षण संस्था, पुसद व्दारा संचालित महात्मा मुंगसाजी आदिवासी आश्रमशाळा, मरसुळ ता. पुसद येथे दि. 18 जानेवारी रोजी उड्ड़ान सपनो की….. 2026
चे वार्षीक स्नेहसम्मेलन एका अविस्म़रणीय सोहळया प्रमाणे संपन्ऩ झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी, मा. ॲड शिवाजीराव मोघे (माजी मंत्री), उध्दघाटक – मा. ना. इंद्रनिलभाऊ नाईक (राज्य़ मंत्री अदिवासी विभाग तथा पालक मंत्री गोंदिया जिल्हा) तसेच विशेष अतिथी जगत गुरु जनार्धन महाराज, मा. माधवराव वैद्य (माजी आयुक्त़), मा. जितेंद्र मोघे (अध्यक्ष म.मु.आदिवासी शिक्षण संस्था, पुसद), मा. ज्ञानेश्व़र तडसे (उपाध्यक्ष), मा. शामराव व्यवहारे (सचिव) तसेच प्रमुख अतिथी मा. ॲड सुनिल ढाले, मा. बाबुसिंग आडे, मा. श्रीराम पवार, मा. प्रकाश पाटील बोंबले, मा. रनविर पाटील, तसेच नगरपरिषद सदस्य़ मा. अभिजित पानपटटे, मा. विशाल घाटे, मा. गजानन टाले (सरपंच बान्सी), मा. गजानन टारफे (सरपंच हर्षी), मा. सचिन सोनुने (सरपंच मोखाड), मा. बिबिशन राठोड, मा. शामराव राठोड, मा. सजन राठोड, मा. कैलास ससाने (पो.उ.नी) व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमास मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
कार्यक्रमाची सुरुवात, मान्य़वरांच्या हस्ते दिप प्रज्व़लन व फित कापुन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक शाळेचे प्राचार्य ए.जि. सय्य़द यांनी केले. प्रास्ताविकेतुन आश्रम शाळेतुन घडलेल्या प्रतिभावंत माजी विद्यार्थ्यांची माहिती नमुद केली. शाळा व्यवस्थापन करित असलेल्या शालेय प्रगती बददल माहिती देवुन समाजातील विद्यार्थ्यांचे उच्च़ शिक्षणाचे प्रमाण वाढण्या करीता कनिष्ठ़ महाविद्यालय सलग्ऩ वरिष्ठ़ महाविद्यालय स्थापन करण्याची मा. राज्य़ मंत्री महोदयाकडे आग्रहाची विनंती केली.
आश्रमशाळेतील प्रतिभावंत माजी विद्यार्थ्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच क्रिडा स्पर्धेतील राज्य़स्तरावर अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व़ करणाऱ्या वयोगट 17 वर्षे खो-खो मुलीच्या संघाचा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मोघे साहेब, मा. इंद्रनिलभाऊ नाईक, मा. जितेंद्र मोघे व इतर मान्य़वरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह़ देवुन गौरविण्यात आले. यामध्ये डॉ. संजय देविदास डाखोरे (MBBS, MS), डॉ. राजेश नथ्थुजी डाखोरे (MBBS, MS), डॉ. मानिक साहेबराव बोंबले (MBBS, MS), डॉ. विश्रांती पांडुरंग मळघणे (MBBS, MS), कु. माहेश्वऱी बाळु शिकरे (MBBS, Appear) तसेच मार्च-2025 च्या माध्य़मिक परिक्षेत आदिवासी विभाग अमरावती मधुन प्रथम क्रमांक प्राप्त़ कु. निकिता श्रीराम घुकसे 92.80% व HSC विज्ञान शाखेचा सुमित प्रकाश दुम्हारे 81.50% गुण घेवुन पुसद प्रकल्पातुन प्रथम आला. तसेच शिक्षण विभागा मार्फत राज्य़स्तरीय कुस्ती स्पर्धेत कु. संचिता रविंद्र राठोड हीने कास्य़ पदक प्राप्त़ केल्या बाबत गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष मा. जितेंद्र मोघे यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्यावर विचार व्यक्त़ केले. तसेच आश्रमशाळा करीत असलेली निरंतर शैक्षणिक प्रगती, स्पर्धा परिक्षा, क्रिडा स्पर्धा, राबवित असलेले नवोपक्रम या बाबत समाधान व्य़क्त़ केले.
उदघाटकीय भाषणामध्ये मा. राज्य़ मंत्री इंद्रनिलभाऊ नाईक यांनी आश्रमशाळेतील प्रतिभावंत गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व समाजातील विद्यार्थ्यांना उच्च़ शिक्षणा करीता आश्रमशाळा सलग्ऩ वरिष्ठ़ महाविद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले. तसेच कर्मचारी भरती बाबत आश्व़स्त़ केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा. ॲड शिवाजीराव मोघे (माजी मंत्री) यांनी प्रतिभावंत माजी विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी यांचा गौरव केला व आश्रमशाळा व्यवस्थापन कर्मचारी यांचे अभिनंदन केले व भविष्यात आश्रमशाळेतील विद्यार्थी IAS, IPS होतील अशी सदिच्छा अपेक्षा व्यक्त़ केली. स्नेहसम्मेलनातील विद्यार्थ्यांचे कलाविष्कार पाहुन कौतुक केले.
या स्नेहसम्मेलनात विद्यार्थ्यांचे कलाविष्कार पारितोषीक वितरण तसेच प्रतिभा आणि जल्लोश यांचा संगम होवुन हे वार्षीक स्नेहसम्मेलन अविस्म़रनिय पर्वनी ठरले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, श्वेता लिलाधर मळघणे आणि प्रा. एस.बि. चव्हाण, वाय.आय. परसुवाले यांनी केले तर आभार प्रदर्शन पि.आर. पाझारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शाळेचे युवा संचालक व समस्त़ कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्ऩ केले.








