Home » संपादकीय » संपादकिय » शिक्षकांचा सन्मान करा, भविष्य तुमचा सन्मान करेल – प्रा. सैय्यद सलमान

शिक्षकांचा सन्मान करा, भविष्य तुमचा सन्मान करेल – प्रा. सैय्यद सलमान

Share:

वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

दिनांक:03/02/2026
वसंतनगर येथील युवक मंडळाद्वारे संचालित वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य कु. वंदना पोले उपस्थित होत्या.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फुलशील नाईक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.वैभव पाटील, तर प्रमुख वक्ते म्हणून मराठी संत साहित्याचे गाढे अभ्यासक व विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा. सैय्यद सलमान सय्यद शेरू हे उपस्थित होते.तसेच व्यासपीठावर क्रीडा विभाग प्रमुख बाळासाहेब कराळे,माजी कार्यक्रमाधिकारी प्रा. नरेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख वक्ते प्रा.सैय्यद सलमान यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिक्षकांचा सन्मान करा, कारण शिक्षक हेच तुमच्या आयुष्याचा पाया घडवतात. जे विद्यार्थी शिक्षकांचा आदर करतात, त्यांचा सन्मान भविष्यकाळ आपोआप करतो.”
ते पुढे म्हणाले की, केवळ गुण मिळवणे महत्त्वाचे नसून मूल्याधिष्ठित जीवन जगणे, परिश्रम,प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी यांची जोपासना करणे आवश्यक आहे. संतांच्या विचारांतून जीवनाला दिशा मिळते आणि त्या विचारांचा स्वीकार केल्यास यश निश्चित मिळते,असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य कु. वंदना पोले यांनी ज्ञान हीच खरी शिदोरी असून तिच्या बळावर विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग सुकर करता येतो, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचाल करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शेषराव राठोड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रश्मी डेकाटे यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा विभाग प्रमुख बाळासाहेब कराळे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश बुरबुरे, अविनाश राठोड, संजय राठोड, अभिजीत राठोड, विजय राठोड, विष्णू इंगळे, भूमेश्वर डोक, महेश चव्हाण, पांडुरंग जाधव, अमोल राठोड, युवराज जाधव आदींनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *