
पुसद वकील संघाच्या सन 2026 च्या निवडणुकीत ॲड. अमोल भाऊ भालेराव यांची खनिजदार (कोषाध्यक्ष) पदावर बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. सदर पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली.
ॲड. अमोल भालेराव हे पुसद येथील न्यायालयात गेल्या अनेक वर्षांपासून वकिली व्यवसायात कार्यरत असून संघटनेच्या कार्यात त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे. संघटनेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त, पारदर्शकता व जबाबदारी राखण्याची त्यांची भूमिका लक्षात घेता, त्यांच्या निवडीचे वकील संघाच्या सदस्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.
या निवडीबद्दल पुसद वकील संघाचे पदाधिकारी, ज्येष्ठ वकील तसेच सदस्यांनी ॲड. अमोल भालेराव यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या कार्यकाळात संघटनेच्या आर्थिक व्यवस्थापनास अधिक सक्षम दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.







