प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची केली पाहणी
पार्डी निंबी
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जास्तीत जास्त घरकुले पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 26 असून 1 मे 26 ला गृहप्रवेश करायचा आहे जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे हक्काच्या घरकुल पासून कोणीही वंचित राहू नये यासाठी यंत्रणेने 1 मे पर्यंत दिलेले घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान केले आहे
राहण्यासाठी हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते मात्र जागा आर्थिक परिस्थिती अभावी अनेकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होत नाही 1 मे पर्यंत घरकुल पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर आली आहे प्रभारी अंमलबजावणी करण्यासाठी गावात प्रभात फेरी काढून जनजागृती केली.
पुसद तालुक्यातील पार्ङी गावाला आज दि. 10/02/2026 रोजी यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिला हप्ता वितरित झालेल्या घरकुलाची पाहणी करून भूमिपूजन करण्यात आले.
तसेच घरकुल लाभार्थ्यांना 30 मार्च पर्यंत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
पार्ङी व गणेशपुर येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या संपूर्ण घराची पाहणी केली ज्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम केले त्यांना दुसरा व तिसरा हप्ता त्वरित वितरित करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल आदेलवाङ. विस्तार अधिकारी शेख साहेब ग्रामपंचायत अधिकारी विजय धावस गृहनिर्माण अभियंता कुणाल आडे करण ढेकळे समाधान केवटे अरुण बरङे समाधान शिनगारे यांच्यासह आशा वर्कर अंगणवाडी सेविका आरोग्य सेवक अक्षय हातमोडे आशा वर्कर महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.







