Home » जीवनशैली » सामाजिक » संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त धार्मिक सोहळा..

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त धार्मिक सोहळा..

Share:

जगदंबा माता योग वर्गाचा पुढाकार; भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन

पुसद (प्रतिनिधी):
जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्थानिक स्नेहनगर, इटावा वॉर्ड येथील जगदंबा माता देवी मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य ‘श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञान यज्ञ आणि अखंड हरिनाम सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या सप्ताहामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.
या सात दिवसीय सोहळ्यात सुप्रसिद्ध कथाकार ह.भ.प. शरद महाराज मोरे यांच्या रसाळ आणि मधुर वाणीतून देवी भागवत कथेचे निरूपण होत आहे. दररोज पहाटे काकडा भजन, हरिपाठ, दुर्गा सप्तशती पाठ, दुपारी देवी भागवत कथा, आणि रात्री हरी कीर्तन व हरी जागर असे भरगच्च कार्यक्रम पार पडत आहेत.
सप्ताहामध्ये ह.भ.प. बबन महाराज चातारीकर, ह.भ.प. हरिश्चंद्र महाराज कार्लेकर, ह.भ.प. अशोक महाराज साखरे, ह.भ.प. विकास महाराज राठोड, ह.भ.प. डॉ. दिनकर बाजड, ह.भ.प. नंदकुमार खंदारे पाटील आणि ह.भ.प. आनंद महाराज माळकर यांची कीर्तनसेवा लाभणार आहे.

विशेष आकर्षण म्हणून रविवार दिनांक १५/२/रोजी सेवालाल महाराजांची पालखी सकाळी आठ वाजता निघेल व त्यानंतर ह.भ.प. कैलास महाराज गायमुख यांचा बंजारा भजनाचा कार्यक्रम आणि श्री संत सेवालाल महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचा पाळणा व भजन याचा कार्यक्रमआयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आणि त्यानंतर सोमवार दिनांक १६/२ रोजी हरिभक्त परायण श्री शरद मोरे महाराज यांच्या मधुर वाणीतून काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक जगदंबा माता योग वर्ग (स्नेहनगर, इटावा वॉर्ड) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *