Home » जीवनशैली » सामाजिक » वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय पुसद येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ व शिक्षक पद प्रक्षालन असा अनोखा कार्यक्रम संपन्न…

वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय पुसद येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ व शिक्षक पद प्रक्षालन असा अनोखा कार्यक्रम संपन्न…

Share:


पुसद : येथील युवक मंडळ द्वारा संचालित, वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय पुसद येथे १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचा तथा शिक्षक पद प्रक्षालनाचा असा भावस्पर्शी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.व्ही.सी.पोले मॅडम तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.ए.बी.राठोड सर , प्रा.श्री.एन.टी.राठोड सर,श्री.बी.एन.डोक सर, श्री.विजय राठोड सर,श्री महेश चव्हाण सर हे मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या शुभहस्ते. विधेची आराध्य देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी वर्ग १०वी(ब)च्या विद्यार्थ्यानी शाळेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वाचे पदप्रक्षालन करून सर्वाना शाल व श्रीफळ देेऊन सम्मान केला.आणि गुरुप्रती निष्ठा,भाव कसा असावा हे अनादी काळापासून चालत आलेल्या गुरु-शिष्य हया पवित्र नात्यांच्या परंपरेला उजाळा दिला.यानंतर इयत्ता १०वी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री.ए. टी.राठोड सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर जेष्ठ शिक्षक श्री.ए.बी. राठोड सर यांनी आपल्या भाषणातून व १०वी च्या विद्यार्थ्याना परीक्षासंबंधी मार्गदर्शन केले.तर अध्यक्षीय भाषण मुख्याध्यापिका कु.पोले मॅडम यांनी केले.परीक्षार्थीनी परीक्षेची भिती न ठेवता निर्भयपणे सामोरे जावे आणि आपले ध्येय साध्य करावे. असे मौलिक मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे सुंदर असे संचालन कु.स्नेहल कोसेकर,कु.सिंपल राठोड यांनी केले.कार्यक्रमाचे आभार शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री.आर.डी.बुरबुरे सर यांनी मानले. या प्रसंगी युवक मंडळ पुसद चे सचिव साहेब आदरणीय विजय भाऊ जाधव यांनी अनोखा निरोप समारंभाचे कौतुक केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इयत्ता ९वी (अ,ब,क)चे विद्यार्थी व इयत्ता ९वी(क)चे वर्गशिक्षक श्री.व्ही.एस.इंगळे सर तथा प्रा.कु.डेकाटे मॅडम,श्री.एस.जी.राठोड सर,श्री.बी.एस.कऱ्हाळे सर आदी शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *