ता. पुसद :-राजना येथील जिओ मोबाईल टॉवर सेवा गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाइन व्यवहार ठप्प झालेला आहे. शासकीय व शैक्षणिक कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहे. आपत्कालीन संपर्कात अडचणी निर्माण होताना दिसत आहे. या समस्यामुळे राजना, भंडारी,ब्राह्मणगाव, रुई येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीला समोर जावे लागत आहे. संबंधित जिओ कंपनी व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन टावर सेवा पुरवत सुरू करावी अशी सर्व नागरिकांची जोरदार मागणी आहे.
नागरिक, राजना परिसर..







