उच्च शिक्षणातील सामाजिक न्याय, आरक्षण व शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन
भिम आर्मी व आजाद समाज पार्टी कां. यांच्या नेतृत्वाखाली आज उपविभागीय अधिकारी कार्यालय, पुसद जि. यवतमाळ येथे यूजीसी कायदा समर्थनार्थ शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले.
उच्च शिक्षण क्षेत्रात सामाजिक न्याय, घटनात्मक आरक्षण, शिष्यवृत्ती तसेच विद्यार्थी व शिक्षकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि यूजीसी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी आपल्या मनोगतात उच्च शिक्षणातील सामाजिक न्याय अबाधित ठेवण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने तात्काळ अध्यादेश आणून एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांना सहकार्य करावे व विद्यार्थ्यांच्या हक्कांवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली
तसेच आजाद समाज पार्टी कां. युवा जिल्हाध्यक्ष राजकुमार भगत यांनी आपल्या भाषणात यूजीसी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली 15 जानेवारी 2026 UGC कायदा केंद्र सरकार नी लागू केला. त्या कायद्या विरोधात काही मूठ भर लोकांनी आंदोलन केले आणि सुप्रीम कोर्टाने त्या कायद्याला स्थगिती दिली. विद्यार्थ्यांच्या हक्का साठी आजाद समाज पार्टी कां जोपर्यंत कायदा लागू होणार नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही व आंदोलन संविधानाच्या चौकटीत राहून करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी आजाद समाज पार्टी (कां.) युवा महासचिव विशाल डाके यांनीही (UGC) ची धोरणे सामाजिक न्याय, आरक्षण आणि विद्यार्थी हक्कांना बळ देणारी असली पाहिजेत.
संविधानिक हक्कांवर कुठलाही आघात आम्ही सहन करणार नाही.
शिक्षणातील समानतेसाठी आमचा लढा ठाम आहे आणि सुरूच राहील. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व आरक्षणाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली.
आंदोलनादरम्यान यूजीसी कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजेत.. शिक्षणावर वार चालणार नाही, यूजीसी कायदा लागू करा, “शिक्षण वाचवा – यूजीसी मजबूत करा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. त्यानंतर मा. राष्ट्रपती महोदया यांना मा. उपविभागीय अधिकारी, पुसद जिल्हा यवतमाळ यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
सदर आंदोलन शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. यावेळी
अशोक भालेराव, राजकुमार भगत, विशाल डाके, राहुल धुळे, प्रशिक कांबळे, शांतिशील जाधव, वैभव सूर्यवंशी, शुभम ढोले, त्रिशूल रावल, आकाश चवरे, अनिल कांबळे, अजय लोखंडे, राजू गायकवाड, वैभव खरतडे, स्वयम इंगळे, संदेश रणवीर, आकाश साळवे उपस्थित होते.







