Home » जीवनशैली » सामाजिक » पुसद तालुक्यातील शिगर धनोरा , जनुना, नादुरा, वडगाव, चिखली परिसरात अतिवृष्टीचा मोठा फटका; ८० टक्के पिके भुईसपाट

पुसद तालुक्यातील शिगर धनोरा , जनुना, नादुरा, वडगाव, चिखली परिसरात अतिवृष्टीचा मोठा फटका; ८० टक्के पिके भुईसपाट

Share:

पुसद :-तालुक्यातील शिगर धनोर, जनुना, नादुरा, वडगाव, चिखली परिसरात अतिवृष्टीचा मोठा फटका; ८० टक्के पिके भुईसपाट
पुसद तालुक्यातील शिगर धनोरा , जनुना, नादुरा, वडगाव व चिखली परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका, ज्वारी आदी पिके अक्षरशः भुईसपाट झाली असून सुमारे 80 टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हाताशी आलेले पीक पूर्णपणे नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाले असून तातडीने नुकसानाची पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.
याबाबत  माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पुसद तालुक्याचे तहसील अधिकारी यांच्याकडे निवेदन देत त्वरित पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली.
शासनाने लवकरात लवकर मदतीचा निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *