Home » जीवनशैली » सामाजिक » तालुका अध्यक्ष कलाध्यापक संघ पुसद ची कार्यकारणी गठीत..

तालुका अध्यक्ष कलाध्यापक संघ पुसद ची कार्यकारणी गठीत..

Share:


स्थानिक : पुसद महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ जिल्हा शाखा यवतमाळ चे जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री निलेश तायडे यांच्या उपस्थितीत दिनांक 07/03/2026 रोजी शनिवारला वसंतराव नाईक विद्यालय पुसद येथे पुसद तालुक्यातील सर्व कला शिक्षकांची सहविचार सभा घेण्यात आली.या सहविचार सभेचे अध्यक्ष मा.निलेश जी तायडे व प्रमुख पाहुणे आदरणीय सुजित ठाकरे,द्वितीय प्रमुख पाहुणे सचिन तथ्ये हे होते.या प्रसंगी पुसद तालुका कलाध्यापक संघ कार्यकारणी एकमताने गठित करण्यात आली असून पुसद तालुका अध्यक्ष श्री.मनोज रोडूसिंग राठोड, उपाध्यक्ष दाऊत खाॅं तायब खाॅं, सचिव श्री.विजय श्रीरामजी देशमुख सहसचिव श्री.नितीन भवदेवराव नांदेडकर कोषाध्यक्ष श्री.एन. जे. चव्हाण हे आहेत तर सल्लागार म्हणून विजय जीवा राठोड व अविनाश मधुकर पाठक यांची निवड झाली असून सदस्य म्हणून श्री.प्रसाद मुंडे,श्री.गजानन शिरगिरे अशा प्रकारे कार्यकारणी गठीत करण्यात आली असून जिल्हा अध्यक्षांच्या वतीने सर्व कार्यकारणीचे स्वागत करण्यात आले व नवीन कार्यकारणीच्या हस्ते जिल्हाध्यक्ष श्री.निलेश तायडे यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले या सहविचार सभेसाठी वसंतराव नाईक विद्यालय पुसद येथे परवानगी दिल्यामुळे आपल्या भाषणातून युवक मंडळ पुसदचे सचिव साहेब मा.श्री विजय भाऊ जाधव व मुख्याध्यापिका कु.वंदना पोले मॅडम यांचे सुद्धा आभार मानले आहे.या कार्यक्रमाचे संचालन श्री.एन.जे.चव्हाण यांनी केले.प्रास्ताविक श्री.विजय जीवा राठोड यांनी केले व आभार विजय देशमुख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *