माजी राज्यमंत्री निरंजन नाईक साहेब
पुसद : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक साहेब यांचे चिरंजीव निरंजन नाईक साहेब हे शनिवार, दिनांक 21 मार्च 2026 रोजी पुसद येथे भेट देणार असून त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पुसद शहरासह परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या स्वागतासाठी विविध स्तरांवर तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
या निमित्ताने संध्याकाळी 5 वाजता चिंतामणी मंदिर, ग्रामीण पोलीस स्टेशन कारला रोड, पुसद येथे एका विशेष सामाजिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार ही सभा राजकीय नसून सामाजिक विषयांवर चर्चा व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.
निरंजन नाईक हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. त्यांच्या पुसद भेटीदरम्यान स्थानिक नागरिक, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. तसेच परिसरातील सामाजिक प्रश्न, विकासकामे व जनतेच्या अपेक्षा याबाबतही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
निरंजन नाईक यांच्या आगमनाची बातमी समजताच पुसद नगरीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील विविध भागात त्यांच्या स्वागताची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व युवक या सभेला उपस्थित राहण्याची तयारी करत आहेत.
सभेला पुसद शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांना प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याने कार्यक्रमाबाबत विशेष उत्सुकता दिसून येत आहे.
प्रतिनिधी : युवराज आशाबाई रामराव चव्हाण
हनुमान नगर, कुंभारी
ता. पुसद, जि. यवतमाळ







