
अशोकराव भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पर्धा परीक्षा संदर्भात सम्पूर्ण माहिती दिली
पुसद : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भीम आर्मी भारत एकता मिशन यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने “सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा – २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा रविवार,दि. ५ एप्रिल २०२६ रोजी पुसद येथील वानरे मंगल कार्यालय समोरील मैदान,बोरगडी रोड,लक्ष्मीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची आवड निर्माण करणे,स्पर्धात्मक परीक्षांसाठी त्यांना प्रेरित करणे तसेच सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देणे हा आहे.जिल्ह्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश संघटक अशोकराव भालेराव यांनी दिली.
सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरवात करण्यात आली.
मा.विनयरतन सिंग राष्ट्रीय अध्यक्ष भीम आर्मी भारत एकता मिशन हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असतील.मा.अशोकजी कांबळे प्रदेशाध्यक्ष भीम आर्मी महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.या कार्यक्रमाचे उद्घाटन वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.संजयभाऊ देशमुख यांच्या हस्ते होईल.मा.ॲड.मोहिनीताई नाईक नगराध्यक्ष न.प.पुसद, मा.पंचशिलाताई इंगोले नगराध्यक्ष न.प.दिग्रस व मा.नालंदाताई भरणे नगराध्यक्ष न.प.आर्णी यांची प्रमुख उपस्थिती असेल.
या स्पर्धेसाठी प्रमुख दोन गटात विभागणी केली असून कनिष्ठ गट वर्ग ५ ते ७ असून यामध्ये एकूण ७ बक्षीचे असतील.प्रथम बक्षीस ११,००० रुपये,द्वितीय ९००० रुपये,तृतीय ७००० रुपये,चतुर्थ ५००० रुपये,पाचवे ३००० रुपये,सहावे २००० रुपये व सातवे १००० रुपये असेल.व वरिष्ठ गटामध्ये वर्ग ८ ते १० असून यामध्ये प्रथम बक्षीस ११,००० रुपये असेल, द्वितीय ९००० रुपये,तृतीय ७००० रुपये,चतुर्थ ५००० रुपये,पाचवे ३००० रुपये,सहावे २००० रुपये व सातवे १००० रुपये असेल.यामध्ये क्रमांकाने येणाऱ्या विद्यार्थांना रोख रक्कम,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.व सहभागी सर्व विद्यार्थांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्ष -२०२६ स्वागताध्यक्ष मा.अशोकराव भालेराव संघटक भीम आर्मी महाराष्ट्र राज्य हे असतील.तसेच मुख्य मार्गदर्शन मा.राम बोरगावकर साहेब तहसीलदार उदगीर जि.लातूर करणार आहेत.सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.उत्तम काणींदे सर सुप्रसिद्ध निवेदक तथा केंद्रप्रमुख किनवट,मा.नरेंद्र पाटील सर,मा.दीपक भवरे सर कृषी सहायक हे करतील.
सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा २०२६ या कार्यक्रमाचे आयोजन भीम आर्मी भारत एकता मिशन यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी 31 मार्च पर्यंत आपली नोंदणी करू शकता
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ९३२५४२५३०१,९८३४९१२३२४,९८२२५१०७१८,९४०४८५०३२८,९९२१७०७११७ या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने आज शासकीय विश्रामगृह पुसद येथे पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले आहे.या पत्रकार परिषदेमध्ये स्पर्धा परीक्षेची सम्पूर्ण माहिती अशोकराव भालेराव भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश संघटक यांनी दिली राजकुमार भगत युवा जिल्हाध्यक्ष आसपा यवतमाळ जिल्हा,अजय लोखंडे तालुका अध्यक्ष भीम आर्मी पुसद,विशाल डाके जिल्हा महासचिव आसपा,व भीम आर्मी तालुका उपाध्यक्ष वैभव सूर्यवंशी, राहुल धुळे, अनिल कांबळे,सविधान कांबळे, अजय कांबळे, रोहित कांबळे, विशाल कांबळे, अनिकेत कांबळे, राजेश कांबळे, अनिकेत कांबळे, ऋतिक कांबळे,इतर पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते.या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन . भीम भीम आर्मी बेलोरा सर्कल प्रमुख प्रशिक कांबळे यांनी केले







