Home » जीवनशैली » सामाजिक » मोरा बैलाच्या तेरवीसोबत शिवार चर्चा सत्राचे आयोजन

मोरा बैलाच्या तेरवीसोबत शिवार चर्चा सत्राचे आयोजन

Share:

वडगाव येथे मोरा बैलाच्या तेरवीनिमित्य
शिवार चर्चा व जैविकशेती मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

पुसद,
प्रतिनिधी,

एकीकडे स्वतःच्या वृद्ध आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा सुशिक्षित लोकांचा कल वाढत असताना,विदेशात नोकरी करणारे काही महाभाग स्वतःच्या आई वडिलांच्याही अंत्यविधीला न येता दुसऱ्यांमार्फत परस्पर अंत्यविधी करवून घेण्याच्या गंभीर व चिंतनिय भिषण घटनांच्या चाहूल लागण्याच्या युगात वडगाव ता.पुसद येथील प्रयोगशिल सेवाभावी शेतकरी श्री. जयवंत मोतीराम राठोड यांनी आपल्या मोरा बैलाच्या आकस्मिक मृत्यू झाल्यामूळे दुःखाच्या गर्तेत पडले.मोरा बैलाची रितसर श्रद्धापूर्वक जड अंतःकरणाने अंत्यविधी पार पाडली.नुकताच आपल्या शेतात मोरा बैलाच्या तेरवी कार्यक्रम घेवून आपल्या पशुप्रमाचे उत्कट दर्शन घडविले.शेतकरी अनेक संकटाचा,अडचणींचा सामना करीत जीवन कंठीत असताना मोरा बैलाच्या तेरवी कार्यक्रमानिमित्य शिवार चर्चा व जैविकशेती जागृती कार्यक्रमाचे आयोजन करुन नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला.विशेष म्हणजे मा.जि.प.सदस्य सामाजिक कार्यकर्ते रामराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात गव्हाचे वीस बावीस क्विंटल प्रतिएकर गव्हाच्या ऐवजी यावर्षी पस्तीस क्विंटल उत्पादन घेतले शिवाय आतापर्यंत तीन ते साडेचार लाखात जाणारा संत्राबगीचा तब्बल सहा लाख एक्कावन्न हजारात गेल्याचे त्यांनी जाहीर कार्यक्रमात आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाला ज्ञानप्रकाश लोकसंस्थेचे राज्यस्तरीय कृषि गौरव पुरस्कृत श्रीपतभाऊ राठोड,नागपूर हे कार्यमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते.त्यांनी संतसेवालाल,लाखा बंजारा आणि पुसदचे भूमीपुत्र क्रांतीसूर्य महानायक वसंतराव व जलक्रांती चे प्रणेते सुधाकर नाईक यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेती व शेतकरी उत्थानासोबत बेरोजगारीच्या समस्यांवर प्रामुख्याने प्रकाश टाकला.याप्रसंगी कु.दिपाली राठोड यांनीही नव्या पिढीसाठी इंग्रजीतून आपले मनोगत व्यक्त केले.शेतकऱ्याकडून श्रीपतभाऊ राठोड व सौ.जयश्रीताई राठोड यांचे सपत्नीक सत्कार करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून मा.जि.प.सदस्य सामाजिक कार्यकर्ते श्री.रामराव चव्हाण व श्री.धर्मगुरू तपस्वी संत डॉ.रामराव महाराज बंजारा विकास फेडरेशनचे श्री.विजय राठोड (रामावत) हे आवर्जून उपस्थित होते.शेतातील प्रेरणादायी दिशादर्शक अनोख्या कार्यक्रमात अडीचसे ते तीनसे शेतकरी महिला पुरुषांचा सहभाग होता हे खास उल्लेखनिय आहे. कार्यक्रमा दरम्यान जयवंत राठोड यांना बैलाच्या वियोगाने अश्रू अनावर झाले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.प्रा.वसंत राठोड(समाजकार्य महाविद्यालय,वाशिम),श्री.उत्तम राठोडसह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *