
पुसद:- संत सेवालाल नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्षपदी विजयराव चव्हाण यांची अविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी रवा नर्सिंग राठोड यांची अविरोध निवड करण्यात आली.या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.या पतसंस्थेचे अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सुनील भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयात संचालक मंडळाची बैठक झाली.
दोघांची अविरोध निवड झाल्याने सुनील भालेराव यांनी जाहीर केले. या प्रसंगी नवनिर्वाचित संचालक सर्वश्री विजयराव चव्हाण, भोपालसिंग चव्हाण अनिल श्रावण चव्हाण नरसिंग रेवा राठोड, अरविंद फुलसिंग जाधव, फुलसिंग गणपत आडे, रामेश्वर काळूराम चव्हाण, मोहन राजू सिंग जाधव, व सौ इंदुबाई मोहन जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.








