
भारतात साहित्याची फार जुनी परंपरा आहे. ह्या देशाचा इतिहास क्रान्ति प्रतिक्रांती चा राहिलेला आहे. अनार्य यांनी म्हणजे भारतीय मुलनिवासीयांनी नेहमी गुलामी विरुध्द संघर्ष केला. त्यांचे साहित्य मानव केंद्रीत होते. अण्णाभाऊ साठेंनी भारतीय साहित्यात वेगळी भर पाडली. असामान्य प्रतिभा असलेला हा साहित्यिक 1ऑगस्ट 1920 ला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जन्माला आहे.भीषण दारिद्र्य तसेच मागास जातीतील मांग म्हणजे मातंग हया जातीत जन्माला आले. अण्णाभाऊ साठे चे वडिल भाऊराव शांत, मेहनती, कष्टाळू होते. आपल्या पारंपारिक टोपल्या विकण्याच्या व्यवसाया सोबत बागकाम, शेत मजुरीचे काम करित. अण्णाभाऊंची कुटुंबाची परिस्थिती बेताची होती. वडिल भाऊराव व आई वालुबाई यांना 5 अपत्ये असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहची काळजी होती. अण्णाभाऊ चुणचुणीत, हुशार होते. त्यांना सरकारी शाळेत टाकण्याचे ठरविले. त्यानुसार गावातील शाळेत अण्णाभाऊ जाऊ लागले.त्यावेळी जातीभेद ही केला जायचा..मागास मुलांना कठोर शिक्षा केली जात असे. अण्णाभाऊंना सुध्दा ह्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. शिक्षकाने दिड दिवसाच्या अण्णाभाऊंना अक्षरे न बोलता आल्याने बेदम मारले. अण्णाभाऊंनी शाळा सोडून दिली. धडपड करणारे अण्णाभाऊ ज्यावेळेस मुंबई ला वडिलासोबत गेल्याने तिथे कामगार लोकांसाठी कम्युनिस्ट लोक अक्षर ओळख येइल असे साक्षरतेसाठी वर्ग चालवित त्यात अण्णाभाऊ शिकले. त्याचप्रमाणे गावातील मित्र मुंबई ला कामासाठी आलेल्या लोकांकडून ज्ञान घेतले. अण्णाभाऊ जीवनाची शाळा त्यांच्या अफाट निरीक्षण शक्ती व उपजत प्रतिभा असल्याने शिकले. आज एम. ए मराठी झालेला सुशिक्षित व्यक्ती साहित्याचे पूर्ण अंग जाणत नाही. परंतु अण्णाभाऊंनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर अमाप साहित्य लिहले. मुंबई ला आल्यानंतर पोटपाण्यासाठी मिळेल ते काम केले. मिल कामगार झाल्यावर कम्युनिस्ट लोकांशी संबंध आला. त्यामुळेच त्यांना कामगारावर होणारा अन्याय लक्षात आला. कार्ल मार्क्स ह्या विचारवंतांच्या विचाराची कम्युनिस्ट चळवळ वर्ग संघर्ष कमी करण्यासाठी उठाव करित असे. कम्युनिस्ट श्रीपाद अण्णा डांगे यांच्या भाषणाने ते प्रभावित झाले. कम्युनिस्ट चळवळीत सामील झाल्याने अण्णाभाऊ साठेंना गायनाचे अंग होते. मुंबई मधील कामगार, वंचीत, गरीब, उपेक्षित लोकांची दयनीय स्थिती पाहीली. जीवनाचा खरा अनुभव तिथे घेतला. त्यातून जीवन सामाजिक परिवर्तनासाठी देण्याचे ठरविले. कम्युनिस्ट चळवळीत गीते म्हणून प्रबोधन करीत साहित्य लेखनाची आवड निर्माण झाली. मुंबईच्या भायखळा येथील कामगार वस्तीत त्यांचे बालपण गेले. जीवन जगतांना वेळोवेळी संघर्ष करावा लागला. कोहीनुर मिल कामगार असतांना कामगारासाठी लढा दिल्याने नोकरी गेली. गावाकडे आजारी बाप सोडून गेला. घरी आल्यावर क्रान्ति सिंह नानापाटील यांच्या विचाराने प्रभावित झाले.1942 च्या छोडो भारत चळवळीत सामील झाले. मुंबई ला परत आल्यावर लालबावटा कला पथक स्थापन करुन अमर शेख, गव्हाणकर शाहीर मिळाले. सारा महाराष्ट्र जागरूक करण्याचे काम हाती घेतले. शाहिर असल्याने साहित्याची सुरुवात गीते, पोवाडे, लावण्या, छक्कड यांनी झाली. स्टॅलीन गार्ड यावर पोवाडा रचून तो पोवाडा विदेशामध्ये पोहचला. आपल्या जमातीतील लोकांचे तमाशा फड होते त्यात अनेक वग लिहिली. तमाशाला लोकनाटयाचा दर्जा मिळवून दिला. अण्णाभाऊ साठेंनी पैसा कमविण्यासाठी साहित्य लिहिले नाही. प्रबोधन करण्यासाठी लिहिले. माझी मैना ही लावणी सयुक्त महाराष्ट्र चळवळीत फार गाजले. मुंबई भांडवलदार लोकांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून सयुक्त महाराष्ट्राचा लढा दिला. असंख्य गीते लिहली. काही गीतांची नोंद आहे काही काळाच्या ओघात विरली. 1948 पासुन कादंबरी लिखाण केले. शाळेत न गेलेल्या अवलीयाने 33 कादंबऱ्या लिहिल्या. त्यात दर्जेदार शब्दरचना आहे. काल्पनिक काहीच नाही. फकिरा ही लोकप्रिय कादंबरी ठरली. कमी आयुष्यात कथा, कादंबरी, नाटके, पोवाडे, लावण्या, गीते, छक्कड, प्रवासवर्णन, अनेक लेख, लोकनाट्य हे लिहुन साहित्य अजरामर केले. विदेशात 27 भाषेत भाषांतर झालेला एकमेव परिवर्तनवादी साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ प्रसिध्द आहे. रशियाने अशा थोर साहित्यिकाची नोंद घेऊन रशियाला बोलवून सत्कार केला. आमचे साहित्यिक लोक अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याला मोठे म्हणण्यास खुजे ठरले. असा हा साहित्यिक 18 जुलै 1969 ला जग सोडून गेला. अशा ह्या थोर साहित्यिकास विनम्र अभिवादन..
एस. एच. भवरे








