
पुसद :-राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम 2023 अंतर्गत (NTEP) यवतमाळ येथे पुसद तालुक्यामध्ये उत्कृष्ठ काम केलेल्या ५ गावांची निवड करण्यात आली.
त्यामध्ये पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मुंगशी, गहुली, खर्षी, अनसिंग, आमटी, या ग्रामपंचायतींना
सन २०२३ मध्ये क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत (NTEP)चे मार्गदर्शक सूचनेनुसार टी.बी. मुक्त गाव कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभाग यांचे मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायतीने वर्षभर अभियान राबविले व कामकाज केले शासनाने १६ तालुक्यातून प्रत्येक तालुक्यातील ५ गावांची निवड करण्यात आली.
या अभियानाअंतर्गत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीना यवतमाळ येथे श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविधालय येथील अधिष्ठाता न्यायवैद्यक शास्त्र विभाग हाँल येथे.१ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी डॉ,श्री, पंकज आशिया (IAS) यांचे हस्ते महात्मा गांधी यांचा पुतळा, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, देऊन सरपंच आणि ग्रामसेवक ,यांचा गुणगौरव आणि सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका वैधकिय अधिकारी डॉ,जय नाईक
सरपंच श्री. अमय चव्हाण., मुंगशी, सत्यभान सरकुंडे खर्षी, नितीन कोल्हे गहूली, सौ बबिता चव्हाण आमटी , विलासजी पिंपळे (प्रशासक) अनसिंग,
ग्रामसवेक, जयवंत साखरे. मुंगशी, महेन्द्र डांगे. खर्शी , शंकर खंदारे. गहुली, विजय ढवळे, आमटी, शितल राठोड अनसिंग,
आरोग्यसेवक– रंजीत गोरमाळी, रोशन गुडापे, धोंडूतात्या मुंडे, दिनेश चव्हाण, नितीन हांडे, सरणे हजर हे होते.यावेळी जिल्हाधिकारी ङाँ.पंगज आशिया यांनी जिल्ह्यातील यापेक्षाही गावे टी, बी,मुक्त करण्यासाठी मार्गदर्शन केले.








