
पुसद :-तालुक्यातील राजना या गावांमध्ये अज्ञात व्यक्तीने सोयाबीनचे नुकसान केले आहे. शेतकरी गोपाल आडणे सकाळी शेतात गेल्यावर त्यांना सोयाबीन कोणीतरी उपटल्याची चित्र दिसले. शेतकरी गोपाळ आडणे यांनी चार एकरात सोयाबीन लागवड केली आहे . अज्ञात व्यक्तीने सोयाबीन उपटून टाकल्यामुळे शेतकऱ्यांचे 15 ते 20 हजार चे नुकसान झाले आहे. एकीकडे असे नुकसान आणि दुसरीकडे प्रचंड पाऊस झाल्यावर नुकसान असे वेदनादायी प्रवास शेतकऱ्यांचा असतो.

शेतकरी रात्र दिवस पोटासाठी शेतात राबत असतो. शेतातून मिळालेला पीक विकून आपल्या परिवाराचा खर्च भागवतो.शेतकऱ्याला शेती करताना खूप कष्ट करून पीक घेत असताना असे काही विकृत बुद्धीचे लोक असतात की, त्यांना कोणावरी दया माया येत नाही. खेडेगावात जीवन जगत असताना शेतकऱ्यांना खूप सुख दुःखाची संघर्ष करून जीवन जगाव लागतो. असे मनोरुग्ण व्यक्ती गावात असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप नुकसान सोसावा लागतो. ही खूप वाईट गोष्ट आहे. गोपालला आई-वडील नाही. गोपाल हा मुलगा खूप मेहनत करून स्वतःचा परिवार चालवतो.अशा या शेतकरी मुलाला न्याय मिळाला पाहिजे असे राजना गावातील लोक सांगत आहे.