
पुसद :-तालुक्यातील जांबबाजार सर्कलमध्ये समनक जनता पार्टीचे कार्यकारणी पदाची निवड करण्यात आली आहे. पुढे जिल्हा परिषद,पंचायत समिती यांची निवडणूक काही महिन्यात होणार आहे. समनक जनता पार्टीने पक्ष बांधणीसाठी मोर्चा हाती घेताना दिसत आहे. जांबबाजार सर्कल मध्ये समनक जनता पार्टीने पक्ष वाढावा यासाठी काही सुशिक्षित तरुणांना पक्ष वाढीसाठी निवड करण्यात आली आहे.
जांब बाजार सर्कल व पंचायत समिती या सर्कल पदाची जबाबदारी म्हणून समनक जनता पार्टीने ऋतिक चंदू राठोड यांची( पंचायत समिती पांडुर्णा) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
प्रा. अनिल राठोड यांच्या हस्ते ऋतिक चंदू राठोड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याप्रसंगी गोरसेना पदाधिकारी उमेश भाऊ खेतावत, तसेच गोरसेना सदस्य उपस्थित होते.








