Home » सामाजिक कारण » राजना या गावात अनुकूल भाऊ चव्हाण यांनी लोकांशी साधला संवाद…

राजना या गावात अनुकूल भाऊ चव्हाण यांनी लोकांशी साधला संवाद…

Share:

लोकनेते अनुकूल भाऊ चव्हाण तसेच राजना गावातील ग्रामस्थ

राजना :- २४/ ०९ /२०२४ रोजी लोकप्रिय आणि तरुणाच्या मनात घर करणारे माननीय अनुकूल भाऊ चव्हाण यांनी राजना गावाला भेट दिली. माननीय अनुकूल भाऊ चव्हाण यांनी राजना गावातील ग्रामस्थांशी विविध विषयावर संवाद साधला. लोकप्रिय नेते असे खेडेगावांमध्ये अनुकूल भाऊ यांची ओळख आहे. त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध पुस्तके व वह्या  वाटप करणे. तसेच एम.पी.ए.सीच्या विद्यार्थ्यांना योग्य ते सहकार्य करणे, अभ्यासिकासाठी सहकार्य करणे, वाचनालयाची चळवळ वाढविणे अशा पद्धतीचे कामे करून त्याने विद्यार्थी व तरुण जन मनात नाव कमविले आहे. सामाजिक कामातून त्याने जनसंपर्क वाढवला आहे.

            राजना गावातील लोकांनी माननीय अनुकूल भाऊ चव्हाण यांचे वरिष्ठ लोकांनी व युवकांनी खूप प्रेम आपुलकी व जल्लोषाने स्वागत केले. त्याप्रसंगी गावातील  अवचितराव पवार( माजी सरपंच, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ) हरिचंद जाधव( माजी सरपंच ) नामदेव राठोड (माजी सरपंच ) नामदेव पवार( माजी ग्रामपंचायत सदस्य ) बाजीराव काळे (माजी सरपंच ) अरुण पवार( माजी तंटामुक्त अध्यक्ष ) संतोष काळे (तंटामुक्त अध्यक्ष)  शंकर आडणे (उपसरपंच ) रामकिसन ठोंबरे (माजी पोलीस पाटील ) ग्रामपंचायत सदस्य मनोहर राठोड, गजू हजारे, ठोंबरे, विनोद पवार,  ग्रामस्थ सुवालाल जाधव, सुखदेव राठोड, माणिक राठोड, शंकर चव्हाण, उद्धल पवार, उल्हास जाधव,गणेश राठोड, जाधव, नामदेव पवार, जयवंतराव पवार, ताराचंद जाधव, बाळू ढोणे  तसेच समस्त गावकरी तरुण युवक मंडळ उपस्थित होते.

Leave a Comment