Home » जीवनशैली » सामाजिक » तांडा सुधार समितीच्या नागपूर जिल्हा कार्याध्यक्षपदी संजय आडे यांची निवड

तांडा सुधार समितीच्या नागपूर जिल्हा कार्याध्यक्षपदी संजय आडे यांची निवड

Share:

जिल्हा कार्याध्यक्ष संजय आडे यांचा   सत्कार करताना सहकारी

बेलोरा : पुसद ,तालुक्यातील हिवळणी तलाव येथील रहिवाशी असलेले व सद्या नागपूर येथे वास्तव्यास असलेले संजय मदन आडे यांची अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या नागपूर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाली असून संजय आडे यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले आहे. नागपूर जिल्हा अध्यक्ष राजू रत्ने व जिल्हा महासचिव राजेश महिंद्र यांनी रोपटे व नियुक्ती पत्र देऊन तांडा सुधार समितीची आचारसंहिता संजय आडे यांना वाचून दाखविली. संजय मदन आडे यांनी यापूर्वी तांडा सुधार समितीचे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष व नंतर अमरावती विभागाचे कार्याध्यक्ष म्हणून उत्कृष्टपणे जबाबदारी सांभाळली आहे. तांडा सुधार समितीच्या बॅनरखाली त्यांनी पुसद तालुक्यात अनेक यशस्वी आंदोलन करून शेतकरी महिला व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे. तांडा सुधार समिती ही कोणालाही जबाबदारी पद देत नाही. संघटनेची एक आचारसंहिता आहे. नोंदणीकृत, संविधानाला प्रमाण माननारी, गैर राजनैतिक संघटन म्हणून तिची एक ओळख असुन संजय आडे या भूमिकेला तडा जाऊ देणार नाही अशी आशा संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ.सुभाष जाधव यांनी व्यक्त केली.याप्रसंगी समितीचे महासचिव नामा जाधव (बंजारा ) उपस्थित होते.लवकरच नागपूर जिल्हा सक्रिय कार्यकारिणी पुनर्गठीत करण्यात येईल असे नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री, राजू रत्ने यांनी कळविले आहे,

Leave a Comment