
पुसद:- तालुक्यातील
सांडवा येथील क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक येथे १५ नोव्हेंबर २०२४ रोजी क्रांतीसुर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला तसेच छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर झाडे यांनी केले. यावेळी सिताराम ढाकरे व सुनील दिंडालकर यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पवन दांडेगावकर यांनी केले.

यावेळी सरपंच कमल ढाकरे , पोलीस पाटील संजय सांडवकर,
उपसरपंच विनायक राठोड, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर झाडे, साहेबराव पांडे ,गजानन कराळे, सिताराम ठाकरे ,प्रवीण पांडे, पांडुरंग आढाव,अनिकेत सांडवकर, दिनेश सांडवकर सचिन सांडवकर, व सर्व समाज बांधव तथा ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.