
पुसद:- सुरुवातीला चुरशीच्या वाटणाऱ्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमदार इंद्रनील नाईक यांनी आपल्या कौशल्याने सूक्ष्म नियोजन करून मोठ्या मताधिकाने पुन्हा विजयश्री खेचून आणली असून ते पुन्हा विधानसभेत दिसणार नाही या मा.शरदचंद्र पवार च्या विधानाला त्यांनी खोटे ठरवत आपली मतदारसंघात असलेली पकड सिद्ध केली आहे.

निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात मिरवणूक काढून मोठ्या विजयास्तव साजरा केला. आमदार इंद्रनील नाईक यांना १२७९६४ मते मिळाली तर शरद मैंद यांना३७१९५ मते मिळाल्याने आमदार इंद्रनील नाईक ९१८३२ हजाराच्या लीडने विजयी झाले आहे. श्री माधव वैद्य यांना मात्र३६५७५ मते मिळवत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहे. विजय झाल्यावर मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आमदार इंद्रनील नाईक व माजी विधान परिषद आमदार निलेय नाईक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी हे रथावर विराजमान होते.