

ग्रामपंचायत अधिकारी एस.टी तडसे यांचा स्तुत्यपूर्ण उपक्रम
पुसद :-
वाढदिवस म्हटले की बॅनर, पार्टी इत्यादी गोष्टीवर होणारा अनाठाई हा अनाठाई खर्च टाळून पंचायत समिती पुसद अंतर्गत येत असलेल्या भोजला व मांडवा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) एस.टी.तडसे यांनी भोजला ग्रामपंचायत येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील विद्यार्थ्यीना वही, पेन या शालेय साहित्याचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी,शिक्षक वृंदांनी व विद्यार्थिनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व या राबविलेल्या स्तुत्यपूर्ण उपक्रमाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक वृंदानी त्यांचे आभार मानले.
यावेळी सरपंच वंदना ठाकरे,उपसरपंच रविंद्र निकम,जि.प.प्रा.मुलांची शाळा मुख्याध्यापक ललिता इंगोले, शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सविता गायकवाड, शिक्षक मंगेश भगत,ग्रा.पं.सदस्य विशाल पेन्शनवार,इत्यादी शिक्षकवृंद , प्रतिष्ठित नागरिक,इत्यादी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक दिगंबर शिंदे यांनी केले तर आभार मंगेश भगत यांनी मानले.