Home » शैक्षणिक » सामाजिक » लाखी येथे दगडी माता पुण्यतिथी निमित्ताने भव्ययात्रा….

लाखी येथे दगडी माता पुण्यतिथी निमित्ताने भव्ययात्रा….

Share:

भावी खासदार मोहिनी ताई तसेच समस्त गावकरी व कर्मचारी वृंद

पुसद :- तालुक्यातील लाखी गावी  दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दगडी माता पुण्यतिथी निमित्य भव्य यात्रा आयोजित केली. या यात्रेला पंचकुशीतून भाविक दगडी माता आणि लोभिवंत महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी हजारो संख्येने भाविक येतात. यात्रेची वैशिष्ट्ये दगडी माता पुण्यतिथी १ जानेवारी म्हणजे नवीन वर्षी येत असते, नवीन वर्षाची पहिली यात्रा येत असल्याने पंचकुशीतील भाविक उत्साहाने यात्रेचा आनंद घेण्यासाठी येत असतात.

           या दिवशी लाखी गावात एक सण असल्यासारखा भास होतो. गावातील कर्मचारी तसेच बाहेरगावी कामासाठी गेलेले भाविक दगडी माता व लोभिवंत महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावात येत असतात. तसेच लोकप्रिय आमदार इंद्रनील नाईक यांची धर्मपत्नी मोहिनी ताई  यांनी सुद्धा या यात्रेला उपस्थिती लावली.

         या दिवशी भाविकांच्या मनोरंजनासाठी आकाश पाळणा विविध प्रकारचे खेळण्याचे दुकान आणि नवनवीन खाद्यपदार्थांचा समावेश यात्रेत असते. समस्त गावकरी तसेच गावातील कर्मचारी व तरुण मंडळ यांच्या वतीने भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित दर वर्षी केला जातो. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आजूबाजूचे सर्व गावातील भाविक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात. यात्रा समाप्तीनंतर गावामध्ये प्रबोधनाचा व भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *