Home » जीवनशैली » सामाजिक » समता सैनिक दलाचे दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिर संपन्न!!

समता सैनिक दलाचे दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिर संपन्न!!

Share:

समता सैनिक दलाचे पदाधिकारी

पुसद :-
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ संरक्षण विभागाच्या अंतर्गत तालुका शाखा पुसद संरक्षण विभागाच्या वतीने शेंबाळपिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील प्रागंणात दोन दिवशीय समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक ११,व १२जानेवारी रोजी करण्यात आले होते.

विविध पदाधिकारी आणि मान्यवर

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भारत कांबळे तर प्रमुख उपस्थिती म्हणून ज्ञानेश्वर अंभ्यकर जिल्हा उपाध्यक्ष संरक्षण ,ल.पु. काबळे जिल्हा संघटक,किशोर आळणे,भोलेनाथ कांबळे समता सैनिक दलाचे, प्रल्हाद खडसे कोषाध्यक्ष, विजय बहादुरे सरचिटणीस,बाबुराव सवगंडे तालुका संघटक तर या प्रशिक्षण शिबिराचे मार्गदर्शक म्हणून सैनिक शिक्षक रवींद्र पचांग अकोला व सचिन वानखडे वणी हे उपस्थित होते.

समता सैनिक दलाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त मानवंदना देण्यात आली.
या दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची निर्मिती का केली? समता सैनिक दलाची कार्यपद्धती, बौद्धिक व शारीरिक इत्यादी विषयावर मार्गदर्शन झाले.

समता सैनिक दलाच्या प्रशिक्षण शिबिरात ६५ प्रशिक्षणार्थीने सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव कांबळे यांनी केले तर आभार माधव मनवर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *