Home » Uncategorized » हेडगेवार नगरात राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांना वंदन !

हेडगेवार नगरात राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांना वंदन !

Share:

विश्वात परिवर्तनाची लाट युवकच आणू शकतात:- ब्रह्मकुमारी वंदना दीदी                                          

थोरा मोठयांचे फक्त वर्णन नाही, आचरण केले पाहिजे : ब्रह्मकुमारी नीता दीदी
पी.एस.आय. संतोष पवार साहेब

धरणगांव : हेडगेवार नगरातील ओम शांती केंद्रात युवादिनानिमित्त मुझफ्फरपुर येथील वंदना दीदी यांनी सांगितले की मानवाला दिव्यशक्ती परमेश्वर देत असतो, विश्वात परिवर्तनाची लाट युवाच निर्माण करतात, भारतातील साठटक्के युवक देशाची शान आहेत. समाज आणि विश्वाला दिशा देण्याचे काम केले पाहिजे. धन, शक्ती, सेवा समर्पित केली पाहिजे, त्यासाठी युवकांनी जागृत राहिले पाहिजे, व्यसनांचा त्याग केला पाहिजे, मनाची एकाग्रता ठेवावी, कशाचीही चिंता-काळजी करू नये असा उपदेश केला. ओम शांती केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी नीता दिदी म्हणाल्या मनात तणाव संघर्ष ठेवू नये, युवकांनी मनोबल वाढवले पाहिजे, त्यासाठी राजयोग, मेडिटेशन घेतले पाहिजे. विविध कला, कार्य मग्न, संगीत, खेळ, नृत्य, मॅनेजमेंट विविध क्षेत्रातून मनशांती आणि दृढ-निश्चय निर्माण होत असतो. मन आणि बुद्धी संस्कारित असू द्या. कार्य करण्यास प्रेरणा मिळेल, कोणत्याही समस्येवर लवकर उत्तर देऊ नये, विचार करून बोलावे. वाईट विचारांवर मात करून चांगले गुण संपन्न झाले पाहिजे. सहनशक्ती कमी करू नये. समायोजन शक्ती वाढवावी. असा उपदेश केला. याप्रसंगी धरणगाव चे पी. एस. आय संतोष पवार साहेब यांनी सांगितले की मोफतची किंमत नसते, विकत घेतल्यावर त्या वस्तूची किंमत वाढते. युवकांनी जर ठरवलं तर भारत विश्वाचा गुरु होऊ शकतो. कोणत्याही संकटाचा सामना मनोधै-र्याने केला पाहिजे. मनोबल वाढवण्यासाठी युवकांनी मेडिटेशन केले पाहिजे, योगा केला पाहिजे, मन, शरीर सुदृढ असलं म्हणजे काम करण्यास प्रेरणा मिळते. असे सांगितले. सर्वप्रथम कुमारी श्रद्धा इनी जागोयुवा गीतावर सुंदर नृत्य सादर करण्यात आले. यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांना दीपप्रज्वलन करून पूजन करण्यात आले.
बहारदार सूत्रसंचालन कल्याणी बेहन यांनी अतिशय सुंदर केले.व वैशाली बहन यांनी पुष्पगुष्छ देऊन मान्यवारांचे स्वागत केले याप्रसंगी श्रोत्यांना शिवसंदेश युगपरिवर्तन कालदर्शिका,तिळगुळ, भेटकार्ड व प्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन, पत्रकार सुधाकर मोरे, ॲड.शरद माळी,विलास महाजन, उपसरपंच चंदन पाटील यासह बांभोरी, रोटवड व धरनगावातील सर्व समाजातील पुरुष व महिला भगिनी,बालगोपाल मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात सहयोगी ब्रह्मकुमारि केन्द्रातील सगळे बंधु आणि भगिनींचा मोलाचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *