
पुसद :-पंचायत समिती पुसद अंतर्गत येत असलेल्या मांडवा ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय समितीने मुल्यांकन तपासणी केली .
यामध्ये अंगणवाडी, जि.प.शाळा, ग्रामपंचायत तपासणी, गावातील भिंतीवरील मणी, नळ कनेक्शन, ग्रामस्वच्छता अभियान घनकचरा, पाणी व्यवस्थापन ,परिसर स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय ,सार्वजनिक शौचालय, वृक्षरोपण ,लोकसहभागातून केलेली कामे विविध कामाची पाहणी करण्यात आली.

या जिल्हास्तरीय समितीमध्ये कदम साहेब सीडीपीओ पं. स. उमरखेड, सखाराम ईसळकर विस्तार अधिकारी पं.स.घांटजी,खंदारे विस्तार अधिकारी (आरोग्य )पं.स.घांटजी,भारत चव्हाण शालेय स्वच्छता तंत्र जि.प.यवतमाळ,संजय राठोड गटविकास अधिकारी पं.स.पुसद, एस. डी.डाखोरे विस्तार अधिकारी पं.स.पुसद,विलास पिंपळे विस्तार अधिकारी पं.स.पुसद ,एस.टी.तडसे ग्रामपंचायत अधिकारी मांडवा,रामेश्वर जाधव समुह समन्वयक, यांची उपस्थिती होती.
यावेळी लोकसहभागातुन वृक्षरोपण केलेल्या रोपट्यांचे संगोपन संवर्धन करणारे कैलास राठोड यांचा उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी अल्का ढोले सरपंच, विजय राठोड उपसरपंच ,एस.टी तडसे ग्रामपंचायत अधिकारी,सुधाकर चव्हाण तंटामुक्ती समिती अध्यक्ष , वसंता आडे सोसायटीचे अध्यक्ष ,सर्व ग्रा.प.सदस्य ,तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.