Home » जीवनशैली » सामाजिक » राजना गावांत संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी…

राजना  गावांत संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी…

Share:

संत सेवालाल महाराज जयंती साजरी करताना ग्रामस्थ

राजना :-पुसद तालुक्यातील राजना येथे मानवतावादी, विज्ञानवादी, क्रांतीकारी, संत शिरोमणी जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांची २८६ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

     राजना ग्रामपंचायत येथे संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळेस गावातील सरपंच,सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर गावामध्ये संत श्री. सेवालाल महाराज १५ फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांनानी  गावामध्ये मिरवणूक काढली, त्या मिरवणुकीला गावातील आजी, माजी सरपंच, ग्रामस्थ, सदस्य,तसेच गावातील  ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीमध्ये बंजारा समाज आपल्या पारंपरिक वेशभूषेत  संस्कृतीचे पालन करून गावभर मिरवणूक काढून डबडा नंगारा वाजून पारंपारिक गीते  म्हणून मोठ्या उत्साहाने संत सेवालाल महाराज  जयंती साजरी केली .

    त्यानंतर गावातील तरुण मंडळी यांनी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. महाप्रसाद लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment