Home » राजकारण » मांडवा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…

मांडवा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…

Share:

प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर

पुसद प्रतिनिधी
पुसद तालुक्यातील मांडवा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५वी जयंती ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच अल्का ढोले ह्या उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे पोलीस पाटिल दत्तराव पुलाते , उपसरपंच विजय राठोड , तटांमुक्ती अध्यक्ष सुधाकर चव्हाण , सोसायटी अध्यक्ष वसंता आडे , कारभारी तुकाराम चव्हाण रमेश ढोले, कैलास राठोड,ग्रा.पं.सदस्य गोपाल मंदाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप आबाळे हे उपस्थित होते.

शिवप्रेमी बांधव

  या उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.यावेळी ग्राम परिर्वतन समितीच्या २०२५अध्यक्षपदी सतिष मंदाडे तर उपाध्यक्ष पदी अमोल चव्हाण यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधाकर चव्हाण यांनी केले.आभार कार्तिक धाड यांनी मानले.

  यावेळी निळकंठ धाड, बजरंग पुलाते , गजानन आबाळे, अविनाश आबाळे ,राहुल जाधव , सतीश मंदाडे , सतीश चिरमाडे , प्रमोाद पुलाते , सुधीर धाड,अक्षय डोळस , तेजस पुलाते,कार्तिक धाड , कृष्णा आबाळे , प्रदुम्न आबाळे, अश्विन आबाळे ,संदिप आबाळे तसेच इत्यादी ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment