Home » शैक्षणिक » सामाजिक » आचार्य पदवी मिळाल्याबद्दल सत्कार संपन्न…

आचार्य पदवी मिळाल्याबद्दल सत्कार संपन्न…

Share:

प्राचार्य श्री.लक्ष्मणराव वानखेडे सर यांचे सत्कार करताना सहकारी परिवार
प्राचार्य श्री. लक्ष्मणराव वानखडे सर सत्कार करताना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी

पुसद :-येथील श्री शिवाजी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमान लक्ष्मणराव वानखेडे सर यांना नुकतीच संत गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती द्वारे आचार्य (डॉक्टरेट) पदवी मिळाली.प्रा. डॉ.लक्ष्मणराव वानखेडे यांनी मानव‌विद्या शाखा अंतर्गत समाजशास्त्र विषयात खूप अभ्यास करून व कठोर मेहनत करून त्यांनी हे यश संपादन केले आहे. ही बाब आपना सर्वांना अभिमान वाटावा अशीच आहे. ४१ वा दीक्षांत समारंभ दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी अमरावती विद्यापीठाच्या भल्य परिसरात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमात त्यांचा मान्यवरांच्या हस्ते ही महान पदवी देवून त्यांचा गौरव करण्यात आला. ही बातमी समजताच श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बेलोरा येथिल मुख्याध्यापक पंडीतराव मस्के,पर्यवेक्षक प्रा.दत्तराव जीवने, प्रा.शालिक वाघमारे, प्रा.योगेश आडे,प्रा. दत्तराव काळबांडे,संजय आसोले,सखाराम धबाले,रमेश तडसे, संभाजी जाधव, गजानन नरोटे, कु. सारजा वाढोणकर गणेशराव जाधव, भास्कर मुकाडे, भिमराव मनवर, सौ. मस्के ताई इत्यादी मंडळीनी डॉ. लक्ष्मणराव वानखेडे सर यांच्या घरी जाऊन (श्रीरामपूर पुसद) त्यांचा सपत्निक सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी भरभरून हर्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी डॉ. वानखेडे, सौ.वानखेडे ताई, कु.बिट्टी वानखेडे हे सर्व भारावून गेले.डॉ.वानखेडे सर म्हणाले आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे व सहकार्यामुळेच हे यश मला मिळाले,सर्व मित्रांनी मला समजून घेतले, माझी प्रत्येक अडचण सोडवली,मला मानसिक आधार दिला,आर्थिक मदत केली, हे तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही. घरगुती अडचन असो अथवा दवखाण्याची समस्या असो मला कधीही बेलोरा येथिल मंडळींनी दूर लोटले नाही. मला सर्वांनीच आपला लहान भाऊ म्हणून वागणूक दिली, असे ते शेवटी म्हणाले, तसेच त्यांनी सर्वांच्या हातात हात देवुन आभार व्यक्त केले. तसेच सर्वांना धन्यवाद देखील आवर्जुन दिलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *