

पुसद: तालुक्यातील बेलोरा येथिल श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय येथे आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत घेतलेल्या कार्यक्रमात् प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के बोलत होते ते पुढे म्हणाले मोठ्या शहरातील काही मुले डोक्याचे केस वाढवतात, कपडे फाटके घालतात. हे यांचे राहणीमान बरोबर नाही, तुम्ही त्यांचे अनुकरण करू नका.तुम्ही चांगल्या सवयी लावुन घ्या. उदा. सकाळी लवकर उठने, व्यायाम करणे, स्वच्छ चांगले कपडे वापरा. डोक्याचे केस जास्त वाढू देऊ नका, बोटांची नखे वाढू देऊ नका,भरपूर अभ्यास करा, अभ्यासाला भरपूर वेळ दया, मोबाईचा वापर अतिशय कमी करा, वर्तमानपत्र वाचण्याची सवय लाऊन घ्या.त्यामुळे आपले सामान्यज्ञान वाढते,चालू घडामोडी समजतात आणि कुठे काय घडले ते समजते इत्यादी सर्व भाहिती त्यांनी समजावून सांगीतली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक प्रा. दत्तरावजी जीवने हे होते. तर प्रमुख पाहुने म्हणून प्रा.शालिक वाघमारे, संजय आसोले हे विचारपीठावर उपस्थित होते. अध्यक्षिय भाषनात प्रा.दत्तराज जीवने म्हणाले आपली गेलेली वेळ परत येत नाही म्हणुन कुठेही वेळ घालु नका.वेळेचा चांगला उयोग करा.आपला वेळ हा अभ्यासात घालवा. अभ्यासात प्रगती करा, अभ्यासात पुढे जा, आपल्या मातृभाषेबरोबरच दुसऱ्या भाषा शिकण्याचा प्रयत्न करा, दुस-या भाषा आपणास आल्या पाहिजेत त्या भाषेमध्ये जे ज्ञान साठवले आहे ते आपणास समजले समजले पाहिजे. हे त्यांनी उदाहरणे देवुन सांगीतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. दत्तराव काळबांडे, प्रा.योगेश आडे, कू. सारजा वाढोणकर, नारायण डोरले, गजानन नरोटे,विजय वंजारे, भास्कर मुकाडे, विठ्ठल ढाले,भिमराव मनवर, रमेश तडसे, संभाजी जाधव, गणेशवार जाधव, शंकररावजी आसोले,जीवन राठोड, विष्णू नप्ते,वेदांत मारकर, विठ्ठल पोले, वैभव जाधव, पांडुरंग मारकंड, इत्यादींनी अथक परीश्रम घेतले. शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून सामुहीक वंदे मातरम् घेवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.