Home » शैक्षणिक » सामाजिक » मुलांनो,वाढत्या उन्हात आरोग्य साभाळा: संजय आसोले

मुलांनो,वाढत्या उन्हात आरोग्य साभाळा: संजय आसोले

Share:

जागतिक आरोग्य दिनानिमित्त संजय असोले मुलांना मार्गदर्शन करताना


पुसद: तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आनंददायी शनिवार या उपक्र‌मातंर्गत घेतलेल्या कार्यक्रमात प्रमूख मार्गदर्शक म्हणून संजय आसोले बोलत होते. ते पुढे म्हणालेत की, आता हळुहळू तापमान वाढत आहे. उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. तेव्हा दुपारी १२ ते ४ या वेळात शक्यतो घराच्या बाहेर पडू नका. फारच महत्वाचे काम असेल तर डोक्याला रुमाल बांधून बाहेर पडा किंवा छत्री घेवुन बाहेर पडा. साधे व पांढरे कपडे वापरण्याचा प्रयत्न करा. पांढरा कपडा कमी प्रमाणात उष्णता शोसुन घेतो, म्हणजे आपणास उष्णतेचा त्रास जास्त होत नाही. इत्यादि अनेक बाबी त्यांनी उदाहरणे देवुन समजावुन सांगीतल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विदयालयाचे मुख्याध्यापक पंडीतराव मस्के यांनी स्विकारले तर प्रमुख पाहूने म्हणून प्रा. दत्तराव जीवने, प्रा. शालीक वाघमारे हे विचारपीठावर उपस्थित होते. अध्यक्षिय भाषनात पंडीतराव मस्के म्हणाले की, आपण बाहेर ठीकानी जात असतांना पिण्याच्या पाण्याची बॉटल नेहमी जवळ ठेवा. आणि दोन-दोन तासाला थोडे थोडे पाणी पीत रहा. जास्त थंड पाणी पिऊ नका असी माहिती दिली या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भास्कर मुकाडे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. दत्तराव काळबांडे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. दत्तराव काळबांडे, प्रा.योगेश आडे, कू. सारजा वाढोणकर, नारायण डोरले, गजानन नरोटे,विजय वंजारे, भास्कर मुकाडे, विठ्ठल ढाले,भिमराव मनवर, रमेश तडसे, संभाजी जाधव, गणेशवार जाधव, शंकररावजी आसोले,जीवन राठोड, विष्णू नप्ते,वेदांत मारकर, विठ्ठल पोले, वैभव जाधव, पांडुरंग मारकंड, इत्यादींनी अथक परीश्रम घेतले. या कार्यक्रमाला भरपूर विध्यार्थी उपस्थित होते.शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून सामुहीक वंदे मातरम् घेवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Comment