Home » शैक्षणिक » सामाजिक » पुसद येथे बौध्दाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन..

पुसद येथे बौध्दाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन..

Share:

पुसद प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ पश्चिमच्या अंतर्गत तालुका शाखा पुसद यांच्या वतीने दि.3 मे ते 13 मे पर्यंत दहा दिवशीय बौध्दाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन पारमिता बुध्दविहार महाविरनगर येथे करण्यात आले आहे.

तालुका शाखा व शहर शाखा पुसद यांच्या वतीने महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध जयंतीचे ( बुध्द पौर्णिमेचे) औचित्य साधून दहा दिवसीय बौध्दाचार्य श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिराचे दरवर्षी आयोजन करण्यात येते त्याचप्रमाणे या वर्षी सुध्दा बौध्दाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या शिबिरासाठी पु.भंतेजी बी संघपालजी महाथेरो भिक्खु संघप्रमुख , पु. भन्ते नागसेजी बडनेरा हे उपस्थित राहणार आहेत. तर केंद्रीय शिक्षक म्हणून सुरेश पवार गुरुजी (माजी राज्य संघटक )हे उपस्थित राहणार आहेत. या शिबिरामध्ये शिबिरार्थी संख्या ३५ आहे. श्रामणेर शिबिरार्थीना भोजनदान, फळआहार,नास्ता ज्या उपासक-उपासिकांना द्याव्याचा असेल त्यांनी संपर्कासाठी भारतीय बौध्द महासभा पुसद शहराध्यक्ष एल.पी.कांबळे ९६८९३६५७२३,कोषाध्यक्ष प्रल्हाद खडसे ८८८८०९७००४ ,भोलानाथ कांबळे ९३७०८५८२१६, सरचिटणीस विजय बहादुरे 9765305524, कार्यालयीन सचिव मिलिंद जाधव 8766559397 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भारत कांबळे ९७६७१८९२५३ अध्यक्ष तालुका शाखा पुसद यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *