Home » Uncategorized » पुसद शेंबाळ पिंपरी मार्गावर भीषण अपघात…

पुसद शेंबाळ पिंपरी मार्गावर भीषण अपघात…

Share:

पुसद :-पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी मार्गावर आमदरी गावाजवळ गुरुवारी दुपारी सुमारास मोटरसायकल आणि इंडिका कारची भीषण धडक होऊन तिघे तरुण गंभीर जखमी झाले. या अपघातात उंचेगाव येथील 27 वर्षीय उमेश जमदाडे यांचा जागीच मृत्यू झाला.

पुसद शेंबापिंपरी मार्गावर आमदरी गावाजवळ घाटावर मोटरसायकल आणि इंडिका भीषण अपघात झाला आहे, या अपघातात मिलिंद वाहुळे रा. शेंबापिंपरी तर नितीन जमदाडे उमेश जमदाडे रा.उंचेगाव येथील तरुण गंभीरपणे जखमी झाले. जखमी झालेल्या युवकांना तात्काळ पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते,पण रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी गंभीरपणे जखमी झालेल्या उमेश यांचा दुर्दैवाने जागीच मृत्यू झालेला होता.

खंबीर जखमी झालेल्या इतर दोघांना शासकीय रुग्णालयातून पुढील उपचारासाठी मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

Leave a Comment