पुसद :- तालुक्यातील युवक मंडळ द्वारा संचलित वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्याल १२वी चे निकाल ६१% कला विभागाचा लागला आहे. वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय मधून प्रथम क्रमांक कु. सपना कवटे ६९.६७%. द्वितीय क्रमांक कु. अनिता चव्हाण ६०% तर तृतीय क्रमांक कु. मोनिका कवटे ५९. ३३% मिळाले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी शाळेचा उत्कृष्ट निकाल लागल्यामुळे युवक मंडळाचे सचिव विजय भाऊ जाधव, कोषाध्यक्ष डॉ. संजय जाधव, सदस्य देव भाऊ जाधव, शाळेचे प्राचार्य अनिल कुरमे, पर्यवेक्षक शिवशंकर घरडे, प्रा. नरेश राठोड, प्रा. रेश्मी टेकाडे, महेश चव्हाण, पांडुरंग जाधव,युवराज जाधव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
