पुसद :- तालुक्यातील श्री लोभीवंत महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पारध नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा वर्ग १२वी निकाल जाहीर झाला असून या निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे.
कला शाखेचा निकाल ९४% तर विज्ञान शाखेचा निकाल ९९. ३०% टक्के लागलेला असून विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक कु. नंदनी संतोष राठोड७९.३४%, द्वितीय क्रमांक कु मनीषा रामराव राठोड७८. ८३%, तृतीय क्रमांक कु. रोशनी संजय आगलावे ७८. ८४% चतुर्थीय क्रमांक आर्यन भाऊसाहेब पवार७८. १७%, आणि कला शाखेतून प्रथम क्रमांक परमेश्वर कुंडलिक भालके ७१. ८३% द्वितीय क्रमांक भावेश नीलकंठ राठोड ६६% प्राप्त करून यश संपादन केले आहे.
सर्व यशस्वी गुणवान विद्यार्थ्यांचे मनोहर नाईक बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था राजना चे अध्यक्ष रामेश्वर अवचितराव पवार, सचिव कैलास रामधन राठोड यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य रवी बुरकुले, तसेच शिक्षक रवी पवार सर, पवन राठोड सर या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.