
पुसद प्रतिनिधी
संपूर्ण मानव जातीच्या प्रगतीसाठी तथागत गौतम बुद्धानी त्रिशरण पंचशीलेची शिकवण दिली आहे. प्रत्येक माणसाने पंचशीलचे महत्त्व समजून घेतले तर चांगला बनू शकतो. यामुळे एकमेकांचा आदर करणे अशाप्रकारे पंचशीलेच्या आचरणामुळे माणुस जीवनात सुखी बनू शकतो असे मत पूज्य भदंत धम्मसेवकजी महाथेरो मुळावा यांनी पुसद तालुक्यातील मांडवा येथील सम्यक संबोधी बुद्ध विहारातील बुद्ध जयंती व बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना प्रथम वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त धम्मदेशनेतुन केले.
यावेळी सम्यक संबोधी बुध्दविहारात पूज्य भदंत धम्मसेवकजी महाथेरो मुळावा, पुज्य भदंत दयानंदजी उपस्थित होते. यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आला. त्यानंतर खिर वाटप करण्यात आली. त्यांनी उपस्थितांना धम्मदेशना दिली. सायंकाळी कॅडल मार्च काढल्यानंतर भोजनदान देण्यात आले.
सायंकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका मयुरी खाडे व संच याचा भीम बुद्ध गीताचा बहारदार कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमासाठी सम्यक संबोधी बुद्धविहार समिती व महिला मंडळ आणि समस्त गावकरी मंडळींनी अथक परिश्रम घेतले.