Home » आरोग्य » बेलोरा येथे “आरोग्य दिन “उत्साहात साजरा.

बेलोरा येथे “आरोग्य दिन “उत्साहात साजरा.

Share:

मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षक  कर्मचारी तसेच विद्यार्थी

पुसद –तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयुष्मान भारत शालेय आरोग्य कार्यक्रम आज दिनांक 08 जुलै 2025 रोज मंगळवार ला घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के सर यांनी स्वीकारले. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. योगेश आडे हे विचार पिठावर उपस्थित होते. यावेळी आरोग्यवर्धिनी दूत म्हणून संजय आसोले ,धनंजय झुंजारे यांची निवड करण्यात आली. तर आरोग्यवर्धिनी संदेश वाहक म्हणून कु.सारजा वाढोनकर ,कु.कोमल चव्हाण या विद्यार्थिनींची निवड करण्यात आली .कार्यक्रमाची सुरुवात आरोग्य रक्षक गीत म्हणून कु.सारजा वाढोनकर ताई यांनी केली.” चांगल्या सवयी अंगीकरा “या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी बोलत असतांना प्रा .योगेश आडे म्हणाले की ,आपण चांगल्या सवयी जोपासले पाहिजेत. सकाळी लवकर उठून किमान अर्धा तास व्यायाम करावा .तसेच इतर वेळ अभ्यासासाठी द्यावा. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव मस्के सर हे मार्गदर्शन करत असतांना म्हणाले की आपल्या शरीराचा एखादा भाग दुखत असल्यास कोणतेही काम करण्यात आपले मन लागत नाही .आपल्या शरीराचे सर्व अवयव हे बहुमोल आहेत .त्यांचे मोल करता येत नाही .जर आपण कोणाला म्हटले तुझ्या शरीराचा एक अवयव जसे की ,हात मला दे तर तुला २० लाख रुपये देतो .तर कोणीही ते मान्य करणार नाही .म्हणून आपले आरोग्य चांगले राहील यासाठी आपण सजग असले पाहिजे. आपले हृदय कशा प्रकारे काम करते तसेच आपले हृदयाचे कार्य काय, हृदयाचे किती भाग पडतात, ही सर्व माहिती त्यांनी उदाहरणासहित विद्यार्थ्यांना समजावून सांगितली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय असोले यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू व विद्यार्थी बंधू भगिनी यांची उपस्थिती लाभली, शेवटी सामूहिक राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *