Home » जीवनशैली » सामाजिक » मुख्य अभियंता गिरीश जोशी यांची सचिवपदी झालेली पदोन्नती सापडली वादाच्या भोवऱ्यात..

मुख्य अभियंता गिरीश जोशी यांची सचिवपदी झालेली पदोन्नती सापडली वादाच्या भोवऱ्यात..

Share:

         तक्रारदार.रमेश गिरोलकर, बांधकाम कॉन्ट्रॅक्टर

यवतमाळ : मुख्य अभियंता गिरीश जोशी भोकरला कार्यकारी अभियंता असताना त्यांनी 39 लाख 55 हजार भ्रष्टाचार केला आहे. त्या संदर्भात न्यायालयात प्रकरण सुरू असताना त्यांनी मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता हे दोन पदोन्नती घेतल्या. आता सचिव या पदावर पदोन्नत होत आहे. त्यांनी शासनाला खोटे शपथपत्र दिले असून माझ्यावर न्यायालयीन केस नाही, असे त्यांनी त्यात म्हटलं आहे.मुख्य अभियंता गिरीश जोशी यांची सचिवपदी झालेली पदोन्नती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कंत्राटदार रमेश गिरोलकर यांनी शपथपत्र शासनाला दिले आहे. संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे. बांधकाम मंत्री यांनी जोशी यांना बडतर्फ करावे अशी मागणी गिरोलकर यांनी केली आहे. या संदर्भात जोशी यांच्यासोबत भ्रमनध्वनीद्वारे संपर्क साधला असता ते हायकोर्टात असल्याचे सांगत बोलण्याचे टाळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *