Home » जीवनशैली » सामाजिक » गाेर हेमंत राठोड यांना चाैकशीअंती रिलीज करण्यात आले…

गाेर हेमंत राठोड यांना चाैकशीअंती रिलीज करण्यात आले…

Share:

नागपुर:- शालार्थ आयडी घाेटाळयात चाैकशी करिता बाेलावण्यात आलेले सहा.शिक्षक हेमंत राठोड यांना मुख्याध्यापक दाखवुन चाैकशी करिता बाेलावण्यात आले.
हेमंत राठोड सहा.शिक्षक हे मंजुषा कॉन्व्हेंट शाळेवरुन सन 2022 मध्ये विद्याभुषन मानेवाडा या शाळेवर समायाेजित हाेवुन आलेले हाेते., “सदर शाळेत त्याच्या आधीच शालार्थ आयडी घाेटाळ्यातील शिक्षक भर्ती करण्यात आली हाेती., म्हणजेच हेमंत राठोड यांचे सदर प्रकरणात कुठलाही हस्तक्षेप दिसुन येत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत आहे.”
“त्यामुळे पाेलिसांनी हेमंत राठोड यांची चाैकशी केली.चाैकशीअंती न्यायालयाने हेमंत राठोड यांना रिलीज केले.”
म्हणून काल नागपुर येथील नायक,कारभारी,हसाबी,नसाबी तसेच बंजारा बांधव हे हेमंत राठोड सहा.शिक्षक यांच्या घरी जावुन सांत्वनपर भेट घेतली. हेमंत राठोड यांना हिम्मत देवुन आपण सदर लढाईत एकटे नसुन संपुर्ण समाज आपल्या पाठीशी उभा आहे असे आश्वासन उपस्थित नातेवाईक तथा नायक, कारभारी, हसाबी,नसाबी,बंजारा बांधवानी दिले.
सदर सांत्वनपर बैठक मध्ये तांड्याचे नायक हुकुमचंद राठाेड,व कारभारी सिताराम राठोड यांनी उपस्थिताचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *