राजना :- पुसद तालुक्यातील राजना या गावी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त यांच्या स्मारक स्थळी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यर्पण करून त्यांच्या क्रांतिकारी साहित्य आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास श्री अवचितराव पवार ( माजी कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद ) गावाचे उपसरपंच शंकर आडणे, माजी सरपंच नामदेव राठोड, माजी सरपंच हरिचंद जाधव, गावाचे पोलीस पाटील श्रीरामे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.








