Home » जीवनशैली » सामाजिक » युवक मंडळ द्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने वसंत नगर येथील पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा…

युवक मंडळ द्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने वसंत नगर येथील पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा…

Share:

पुसद :-युवक मंडळ द्वारा संचलित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने वसंत नगर येथील पोलीस स्टेशन येथे विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा सण मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. युवक मंडळाचे सचिव विजय भाऊ जाधव तसेच उपाध्यक्ष देव भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनात व सूचनेनुसार पोलीस बांधवा विषयी रक्षाबंधनाचा सण महत्त्वाचा असतो, कामाचा व्याप व सुट्ट्या मिळत नसल्याकारणाने सणानिमित्त त्यांना आपल्या गावी बहिणी कडे जाता येत नाही म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाच्या वतीने विद्यार्थिनीं वीस-पंचवीस बांधवांना राख्या बांधून व पेढे भरून सण साजरा करण्यात आला. लाडके पोलीस दादा यांच्याकडून आमच्या रक्षणाची काळजी घ्याल असा संवाद साधला.यावेळी शाळेचे प्राचार्य अनिल कुरमे, कार्यक्रमाधिकारी शेषराव राठोड, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक कुमारी रश्मी डेकाटे, प्राध्यापक नरेश राठोड, आशिष राठोड, विजय राठोड या कार्यक्रमाच्या यशाकरिता उपस्थित होते. तसेच ठाणेदार माननीय श्री सतीश जाधव यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधताना मला तीन बहिणी आहेत परंतु मी आज विद्यार्थ्याकडून राखी बांधून मला सणाचे महत्त्व लक्ष्यात आले असे सांगितले यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस बांधवांनी सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये पोलीस स्टेशन मधील भीती कमी होण्याच्या दृष्टीने ठाणेदार कार्यालय, तक्रारीचे ऑफिस, संगणक कक्ष, बाजीराव पट्टा, व बंदुकीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना यावेळी पोलीस बांधवांना दिले. विद्यार्थ्यांना केळीचे वाटप व भेटवस्तू पोलीस बांधवाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *